मस्साजोग (बीड) येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण !
बीड – पवनचक्की प्रकरणात २ कोटी रुपयांच्या खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड याने न्यायालयाकडे आपल्याला ‘स्लीप एपनिया’ नावाचा आजार असून त्यासाठी २४ घंटे राज्य गुन्हे अन्वेषण शाखेच्या कोठडीत एक साहाय्यक मिळावा; म्हणून याचिका प्रविष्ट केली होती, ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ‘कोठडीत असा साहाय्यक देता येत नाही’, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
आरोग्य तज्ञांच्या मते ‘स्लीप एपनिया’ ही एक गंभीर समस्या आहे. या समस्येने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला झोपेच्या वेळी श्वास घेणे बंद होते. आपला मेंदू पुरेसा जागृत राहून आपले रक्षण करण्याचे काम करत असतांना, ही समस्या आपल्या झोपेत व्यत्यय आणते.