म्हादई विषयावर शासन आणि शैक्षणिक संस्था यांमध्ये अधिक संवादाची निकड ! – महाधिवक्ता देवीदास पांगम

म्हादईच्या विषयावर पर्यावरण अभ्यासक, विचारवंत आणि शासन यांच्यात अधिक संवाद होणे आवश्यक आहे. यामुळे अधिकाधिक धोरणात्मक सूत्रे राज्याला लाभतील

गोव्यातील ६ कॅसिनोंवर अंमलबजावणी संचालनालयाच्या धाडी

अंमलबजावणी संचालनालयाच्या कोची विभागाने ३० ऑक्टोबरच्या रात्री पणजी आणि आसपासच्या परिसरातील कॅसिनो मिळून एकूण ८ ठिकाणी धाडी टाकल्या.

मालवण येथे ‘राजकोट’ किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे आज भूमीपूजन

मालवण येथे ४ डिसेंबर या दिवशी साजर्‍या होणार्‍या नौदल दिनाच्या निमित्ताने येथील ‘राजकोट’ किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येत आहे.

आपल्‍या विकासातील जातीव्‍यवस्‍थेचा अडसर दूर करायला हवा ! – चंद्रकांत पाटील, उच्‍च आणि तंत्रशिक्षण मंत्री

जातीपातीचे राजकारण थांबवण्‍यासाठी आपण सर्वांनी जातीच्‍या वर येत ‘सगळ्‍यांचा विकास ही ईश्‍वराची पूजा आहे’, असा विचार करायला हवा.

प्रभादेवी (मुंबई) येथे महागड्या विदेशी मद्याचा साठा जप्‍त

राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाच्‍या पथकाने ही कारवाई केली असून जाफर शेख आणि दिग्‍विजयसिंग जडेजा यांना अटक करण्‍यात आली आहे.

मुंबई पोलिसांना धमक्‍यांचे येणारे अधिक संपर्क फसवे !

अमुक ठिकाणी घातपात होणार आहे, अशा स्‍वरूपाच्‍या धमक्‍या देणारे फसवे संपर्क आणि संदेश आल्‍याने पोलिसांना मनःस्‍ताप होत आहे.

पेठ शिवापूर (सातारा) येथील अनधिकृत मदरशाला मोरगिरी विभागातील ग्रामपंचायतींचा ठरावाद्वारे विरोध !

अनधिकृत मदरशाविषयी पंचक्रोशीतील ग्रामपंचायती ठराव घेत असतांना ठरावाची योग्‍य ती नोंद घेण्‍याऐवजी ‘चौकशी करू, नंतर पाहू’, असे धोरण जिल्‍हा प्रशासनाकडून अवलंबले आहे.

मराठा आरक्षणप्रकरणी आंदोलनाचे राज्‍यभरात तीव्र पडसाद !

मराठा समाजाचा व्‍यवसाय शेती आहे. यापूर्वी ६० टक्‍के मराठा आरक्षणात गेले आहेत. जे थोडे राहिले आहेत, त्‍यांच्‍यासाठी विशेष अधिवेशन बोलवा. ज्‍यांना घ्‍यायचे ते कुणबी प्रमाणपत्रे घेतील.

मंचर (पुणे) येथे इस्रायलकडून हमासवर होणार्‍या हवाई आक्रमणाच्‍या विरोधात मुसलमानांचा मोर्चा !

इस्रायलकडून गाझापट्टीत ‘हमास’ या आतंकवादी संघटनेवर हवाई आक्रमणे होत आहेत. या घटनेच्‍या निषेधार्थ मंचर (ता. आंबेगाव) शहरातील मुसलमानांनी मोर्चा काढून याचा निषेध व्‍यक्‍त केला. मोर्चानंतर इस्रायलच्‍या विरोधात निषेध सभेत मुसलमानांनी रोष व्‍यक्‍त केला.

भूसंपादन रखडल्‍यामुळे पुणे महापालिकेला आर्थिक फटका !

१५ जागा ताब्‍यात घेण्‍यासाठी महापालिकेला हा खर्च करावा लागणार असून भूसंपादन रखडल्‍यामुळे याच्‍या खर्चात २९४ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.