पंढरपूर मंदिर आणि अक्कलकोट तीर्थक्षेत्र यांच्या विकास आराखड्याला शासनाकडून मान्यता !
पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंढरपूर मंदिर विकास आराखड्याचे या वेळी सादरीकरण केले. यामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धन, पायाभूत सुविधा, गर्दी व्यवस्थापन, पर्यटक सुविधा नियोजन करण्यात येणार आहे.