शाळांमध्ये रामायण आणि महाभारत शिकवणार नाही ! – ‘एन्.सी.ई.आर्.टी.’

या संदर्भातील शिफारसीचे वृत्त ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ने फेटाळले !

नवी देहली – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (‘एन्.सी.ई.आर्.टी.‘ने) तिच्या शालेय अभ्यासक्रमांमध्ये रामायण आणि महाभारत यांचा समावेश करण्यात येणार असल्याचे वृत्त निराधार असल्याचे म्हटले आहे. एका समितीने ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ने या संदर्भात शिफारस केली असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.  इतिहासकार आणि निवृत्त प्रा. सी.आय. आयझॅक यांच्या नेतृत्वाखालील सामाजिक विज्ञान समितीने ही शिफारस केली होती. ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ने म्हटले आहे की, अशी कोणतीही समिती अस्तित्वात नसून प्रा. आयझॅक यांनी जे काही म्हटले आहे, ते त्यांचे वैयक्तिक मत आहे.

संपादकीय भूमिका 

अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध होऊन काही दिवस झाल्यानंतर ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ला आता जाग आली का ? या संदर्भात केंद्र सरकारने देशातील १०० कोटी हिंदूंना योग्य स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे !