प्रदूषण वाढवणारे फटाके वाजवणार्‍या १५० हून अधिक जणांवर गुन्‍हे नोंद !

केवळ गुन्‍हे नोंद करून न थांबता संबंधितांना कठोर शिक्षा केल्‍याविना असे प्रकार थांबणार नाहीत !

नवी मुंबईची पहिली मेट्रो आजपासून धावणार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते या मेट्रोच्‍या मार्गिकेचे उद़्‍घाटन करण्‍यात येणार होते; पण आता मुख्‍यमंत्री शिंदे यांच्‍या आदेशानंतर ही चालू करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. 

भारतात लवकरच धर्माधारित हिंदु राष्‍ट्र स्‍थापन होणार ! – श्रीराम काणे, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

सध्‍या सनातन धर्माचे महत्त्व संपूर्ण जगाला कळायला लागले आहे. युरोप-अमेरिकेतील अनेक लोक स्‍वतःहून हिंदु धर्म स्‍वीकारत आहेत. धर्माच्‍या आधारे भारतात लवकरच हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना होईल !

२ आणि ३ डिसेंबरला नागपूर येथे राज्‍यशासन आयोजित करणार ‘महारोजगार मेळावा’ !

या मेळाव्‍यासाठी ६ कोटी ४५ लाख ४७ सहस्र रुपये व्‍ययाचे असे अंदाजपत्र कौशल्‍य, रोजगार, उद्योजकता विभागाने शासनाकडे सादर केले आहे.

फटाक्‍यांचे आमीष दाखवून ८ वर्षीय मुलावर लैंगिक अत्‍याचार करणारा अटकेत !

गुन्‍हे नोंद आहेत, तर अद्याप शिक्षा का झाली नाही ? कारवाईतील दिरंगाईमुळेच आरोपी वारंवार गुन्‍हे करण्‍यास धजावतात

गरीब आणि निर्धन रुग्‍णांवर उपचार करणे रुग्‍णालयांना बंधनकारक ! – सुधीरकुमार बुक्‍के, धर्मादाय सहआयुक्‍त

सार्वजनिक धर्मादाय न्‍यासांतर्गत नोंद असलेल्‍या आणि वार्षिक ५ लाख रुपयांपेक्षा अधिक व्‍यय असलेल्‍या रुग्‍णालयांनी गरीब रुग्‍णांना सवलतीच्‍या दराने अन् निर्धन रुग्‍णांस विनामूल्‍य आरोग्‍य उपचार द्यावेत. ‘या नियमांचे उल्लंघन केल्‍यास त्‍या रुग्‍णालयांवर कारवाई केली जाईल.

ऐरोली येथे गोवंशियांच्‍या मांसाची वाहतूक करणार्‍या धर्मांधाला अटक

गोवंशियांच्‍या हत्‍येस बंदी असतांना उघडपणे त्‍यांची हत्‍या करून मांस विक्रीसाठी नेणे यातूनच धर्मांधांना कायद्याचा धाक उरला नसल्‍याचे दिसून येते !

७० वर्षीय मौलानाकडून विवाहितेवर १० वर्षे अत्‍याचार !

मौलानांकडून होणार्‍या लैंगिक अत्‍याचाराविरोधात वृत्तवाहिन्‍या कधी चर्चासत्रांचे आयोजन करत नाहीत, हे लक्षात घ्‍या !

पिंपरी (पुणे) येथील पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणप्रकरणी पंतप्रधान मोदींकडे तक्रार !

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाच्‍या ते लक्षात का येत नाही ?

७ जण रायफल नेत असल्‍याचा मुंबई पोलिसांना आलेला दूरभाष खोटा !

पोलीस अधिकार्‍यांची ऊर्जा अशा प्रकरणांत विनाकारण व्‍यय होत असतांना यावर आतापर्यंत ठोस उपाय का काढला नाही ?