महाराष्ट्रातील शाळांमध्ये ‘आनंददायी शनिवार’ साजरा होणार !

स्तुत्य निर्णयाविषयी शासनाचे अभिनंदन ! मुलांना लहानपणापासूनच ‘आनंद कसा मिळवायचा ?’, हे शिकवल्यास आत्महत्या, निराशा यांचे प्रमाण न्यून होईल !

‘आगाशे विद्यामंदिर’ने आता राज्यातही यश मिळवावे ! –  डॉ. परकार

सातत्यपूर्ण उपक्रम, उत्कृष्ट नियोजन, अच्युतराव पटवर्धन आणि जोग सरांची उच्चतम शैक्षणिक गुणवत्ता, कार्यानुभव, शालेय सुंदर परिसर, बालमनावरील संस्कार यांमुळे शाळेला यश मिळाले.

शिक्षकेतर कर्मचार्‍यांना मिळणार आश्वासित प्रगती योजनेचा लाभ

राज्यातील खासगी मान्यताप्राप्त शाळांमधील कर्मचार्‍यांना आश्वासित प्रगती योजनेचा लागू करावी, अशी मागणी गेली अनेक वर्ष शिक्षकेतर महामंडळाच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात येत होती.

भारत ‘पाकिस्तान’ आहे का ?

मुसलमानांचा पवित्र मास रमझानच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने शाळांच्या वेळांमध्येच पालट केले आहेत. तसा आदेश राज्यातील शाळांना देण्यात आला आहे. आंध्रप्रदेश शालेय शिक्षण विभागानेही उर्दू माध्यमाच्या शाळांच्या वेळा पालटल्या आहेत.

विद्यार्थ्यांसाठीचे जागतिक स्तरावरील गृहपाठ धोरण स्वीकारण्याची आवश्यकता ! – राज्यपाल रमेश बैस

जगातील अनेक राष्ट्रांत विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला जात नाही, आपणही हे धोरण स्वीकारण्याची आवश्यकता आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्याऐवजी शाळेतच अभ्यास करून घ्यावा, असे मत राज्यपाल रमेश बैस..

जिल्हा परिषद शिक्षकांची अद्यापही ९८६ पदे रिक्त

जिल्ह्यातील शिक्षक भरती गेली अनेक वर्षे रखडली होती. आंतरजिल्हा स्थानांतरामुळे शिक्षकांची संख्याही प्रतीवर्षी वाढत होती. शिक्षक अल्प असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होत होती.

‘कॉपी’ची कुप्रथा !

कॉपी करणे म्हणजे स्वतःला गुन्हेगारीची सवय लावून घेणे. वर्षभर अभ्यास करून परीक्षेला आनंदाने सामोरे जाणे ही नैतिकता, तर वर्षभर उनाडक्या करून ऐन परीक्षेच्या काळात अभ्यास झाला नाही, म्हणून कॉपीसारख्या गैरमार्गाचा अवलंब करणे, ही अनैतिकता आहे.

देववाणी संस्कृत ही देशातील पहिल्या पसंतीची भाषा बनवायची आहे ! – राज्यपाल रमेश बैस

देशाचा वर्तमानकाळ आणि भविष्य संस्कृतविना शक्य नाही. संस्कृत ही जगातील अन्य भाषांची जननी आहे; मात्र शिक्षण, वैद्यकीय आणि अन्य क्षेत्रांत इंग्रजी भाषेचे वर्चस्व असण, हे दुर्दैवी आहे.

‘मुख्यमंत्री माझी शाळा’मध्ये आगाशे विद्यामंदिर रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम

नेहमीच विविध उपक्रम शाळेत होतात. शिवाय संगणक शिक्षण, सुसज्ज वाचनालय, आनंददायी परिसर, सुरेख उद्यान, हुशार विद्यार्थी अशा सर्वच गोष्टीत अग्रेसर असल्याने या शाळेने बाजी मारली.

मराठी गांभीर्याने न शिकवल्यास शालेय शिक्षण विभागाची कारवाईची चेतावणी !

मराठी भाषा शाळांमध्ये नीट शिकवली जाण्यासाठी शिक्षण विभागाला कारवाई करण्याची वेळ येणे हे दुर्दैवी !