कोल्हापूर, २ जानेवारी (वार्ता.) – कलियुगात मनुष्याला पती-पत्नीचे वारंवार खटके उडणे, दांपत्याला लवकर मूल न होणे, झाल्यास जन्मतः अपंग असणे, मुला-मुलींचे विवाह लवकर न होणे यांसह विविध त्रासांना सामोरे जाव लागते. कलियुगात नामस्मरण ही सर्वश्रेष्ठ साधना असून विविध त्रासांवर मात करण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले. ‘श्री नृसिंह सरस्वती जन्मोत्सवा’च्या निमित्ताने १ जानेवारी या दिवशी राजेंद्रनगर येथे आयोजित कार्यक्रमाच्या प्रसंगी त्यांनी हे आवाहन केले.
समारोपाच्या प्रसंगी भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. रूपाराणी निकम यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. व्याख्यान ऐकल्यावर काहींनी ‘व्याख्यानातून अमूल्य ज्ञान मिळाले’, असे सांगितले, तसेच काहींनी साधनाविषयक अधिक माहिती जाणून घेतली. याचे आयोजन डॉ. रमेश मिरजकर यांनी केले होते.