नवी मुंबई – शहरातील अनधिकृत बांधकामांसह अनधिकृत होर्डिंग आणि बॅनर्स यांवर धडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या संदर्भात नागरिकांनी तक्रार करावी, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी केले आहे.
‘अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात काही याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केल्या आहेत. या प्रकरणी उच्च न्यायालयाने सर्व महापालिकांना काही आदेश दिले आहेत. त्यानुसार फौजदारी गुन्हे नोंदवण्याची कारवाई करण्यात येणार आहे. याविषयीच्या तक्रारी www.nmmc.gov.in या संकेतस्थळावरील ग्रिव्हेन्स पोर्टलवर किंवा ‘My NMMC माझी नवी मुंबई’ या मोबाईल अॅपवर अथवा ८४२२९५५९१२ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर कराव्यात’, असेही गेठे म्हणाले.