काँग्रेसच्या ‘नॅशनल हेराल्ड’ मुखपत्राची क्षमायाचना

रामजन्मभूमी खटल्याच्या प्रकरणी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची तुलना पाकच्या सर्वोच्च न्यायालयाशी केल्याचे प्रकरण : हिंदुद्वेषी काँग्रेसकडून याहून वेगळी अपेक्षा काय असणार ? न्यायालयाचा अवमान केल्यावरून या मुखपत्रावर कारवाई झाली पाहिजे !

काँग्रेसची विचारसरणी ‘फुटीरतावादी’ आणि ‘पाकिस्तानधार्जिणी’ ! – आनंद स्वरूप शुक्ला, भाजप नेते

काँग्रेसची विचारसरणी ‘फुटीरतावादी’ आणि ‘पाकिस्तानधार्जिणी’ आहे. स्वातंत्र्यानंतर देशावर सर्वाधिक काळ राज्य करणार्‍या काँग्रेसने धर्मांधांचे अतीलांगूलचालन केल्यानेच देशाची अतोनात हानी केली. यामुळेच आता काँग्रेसला अखेरची घरघर लागली आहे, हेच सत्य आहे !