श्री कानिफनाथ देवस्थानवर (जिल्हा अहिल्यानगर) आक्रमण करणार्‍या धर्मांधावर कारवाई करा !

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे निवेदन

कोल्हापूर – अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गौह या गावातील श्री कानिफनाथ देवस्थान हे या गावाचे ग्रामदैवत असून मंदिराच्या बाजूला अवैधरित्या दर्गा निर्माण करून मंदिराची ३९ एकर जागा ‘वक्फ बोर्डाच्या घशात घालण्याचा कुटील डाव चालू आहे. दिवाळीच्या निमित्ताने या मंदिरात कार्यक्रम चालू असतांना अचानक स्थानिक धर्मांधांच्या जमावाने ‘हे मंदिर नसून दर्गा आहे’, असे म्हणत मंदिरातील पुजारी आणि भाविक यांना मारहाण केली. तसेच तेथील धार्मिक कार्यक्रम बंद पाडला. तरी आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करावी आणि यामागील मुख्य सूत्रधार शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने कोल्हापूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आले.

या प्रसंगी ‘एकमुखी दत्त देवस्थान’चे मठाधिपती श्री. संतोष गोवासी महाराज, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप आणि रेखा दुधाणे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, उद्धव ठाकरे गटाचे करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव आणि उपशहरप्रमुख श्री. शशी बीडकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, हिंदुत्वनिष्ठ श्री. उमेश देशमुख, विश्व हिंदु परिषदेचे श्री. विजय पाटील उपस्थित होते.