चांदणी चौक (पुणे) येथील वेद भवन परिसरात सहस्रो नागरिकांचा वाहतूक समस्येविरोधात मूक मोर्चा !

वेद भवन परिसराच्या विविध रहिवासी इमारतीतील रहिवाशांनी सुरक्षित रस्त्याच्या मागणीसाठी ३ नोव्हेंबर या दिवशी मूक महामोर्चा काढून विविध यंत्रणांचे लक्ष्य वेधून घेतले.

डागडुजीनंतर काही दिवसांतच ग्रह, तारे या संदर्भातील माहिती देणार्‍या चिंचवड येथील तारांगणला गळती !

शहरातील विद्यार्थ्यांना अवकाश, खगोल, ग्रह आणि तारे या संदर्भातील माहिती मिळावी; म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील सायन्स पार्कशेजारी तारांगण उभारण्यात आले आहे.

‘ड्रग्ज’मध्ये कोणत्याही नेत्याचा संबंध असो, त्याला ठेचलेच पाहिजे ! – मुनगंटीवार, वनमंत्री

ड्रग्ज (अमली पदार्थ) व्यवसायात कोणत्याही नेत्याचा संबंध असो, त्याला ठेचून काढलेच पाहिजे. जे आमदार आणि खासदार होतील, त्यांच्या कुटुंबात अमली पदार्थांचा परवाना असता कामा नये.

नांदेड येथे ६ लाख ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या बांधकाम अधीक्षकासह वरिष्ठ लिपिकाला अटक !

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूत आणि वरिष्ठ लिपिक विनोद कंधारे यांना ६ लाख ४० सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली.

असा हिशेब करायला लागलो, तर अनेक नेते अडचणीत येतील ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

यूट्युबर एल्विश यादव याच्या विरुद्ध रेव्ह पार्टी आयोजित केल्याविषयी आणि त्यात सापाचे विष वापरल्याविषयी गुन्हा नोंद केला आहे.

नवी मुंबईसह पनवेल महापालिकेच्या कर्मचार्‍यांना दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान घोषित !

नवी मुंबई महापालिकेतील करार आणि तात्पुरत्या स्वरूपातील ४ सहस्र ५९९ कर्मचार्‍यांना २४ सहस्र रुपये, तर आशासेविका यांना १४ सहस्र रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे.

मराठा आरक्षणासाठी मराठवाडा येथे आणखी ४ जणांच्या आत्महत्या !

समाजाचा संयम संपत चालल्याचे उदाहरण ! धर्मशिक्षण नसल्यामुळे आत्महत्येमुळे जीवनात होणारी हानी लक्षात येत नाही !

धुळे येथे २ सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या मंडल अधिकार्‍यास अटक !

तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे शिरपूर तालुक्यातील वेरूळ येथे शेतभूमी आहे. तिची वाटणी करून नावावर करून देण्यासंबंधी अर्ज केला होता.

हवा प्रदूषित करणार्‍या बांधकाम विकासकांवर महापालिकेकडून कारवाई !

महापालिकेने धूळशमन यंत्राद्वारे (‘एअर प्युरिफाय मोबाईल व्हॅन’) हवेतील धुळीचे प्रमाण अल्प करण्याचा प्रयत्न केला आहे, तसेच काही मोठ्या बांधकाम व्यावसायिकांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत

अजित पवार यांच्याविषयी पुस्तकात लिहिल्याने पुणे येथील कार्यक्रमाचे निमंत्रण रहित ! – मीरा बोरवणकर, माजी आय.पी.एस्. अधिकारी

मीरा बोरवणकर लिखित ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात राजकीय प्रकरणांशी निगडित अनेक विधाने आहेत. एका विधानात नीलम गोर्‍हे आणि मिलिंद नार्वेकर हे ‘दंगल कशी घडवून आणायची ?’ याविषयी चर्चा करत असल्याचे म्हटले आहे.