गडचिरोली येथे लोहखाणीचे समर्थन करणार्‍या गावच्या पाटलाची नक्षलवाद्यांकडून हत्या

लवकर सुधारा, अन्यथा जनता कधीही माफ करणार नाही’, अशा शब्दांत नक्षलवाद्यांनी खाण समर्थकांना पत्रकातून धमकी दिली आहे.

संरक्षित स्मारकांच्या संवर्धनासाठी शासनाकडून ४८ कोटी रुपयांचे वितरण !

राज्यातील १३ राज्य संग्रहालयांतील शिवकालीन शस्त्रांचे जतन आणि संवर्धन करण्यात येणार आहे. यासाठी ४ कोटी ४६ लाख ७६ सहस्र २८४ रुपये इतका निधी संमत करण्यात आला आहे.

गोशाळा चालवणार्‍या महाराजांवर पशूवधगृह चालवणार्‍याकडून प्राणघातक आक्रमण !

गोरक्षण करणारे महाराज यांच्यावर प्राणघातक आक्रमण व्हायला हा भारत आहे कि पाकिस्तान ? बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात त्यांचेच जीवन असुरक्षित असणे हे हिंदूंसाठीच लज्जास्पद !

Law Against Deepfake : ‘डीपफेक व्हिडिओ’च्या विरोधात लवकरच कायदा होणार !

‘डीपफेक व्हिडिओ’, सिंथेटिक व्हिडिओ आणि खोटे वृत्त प्रसारित करणार्‍या वापरकर्त्यांवर कारवाई केली नाही, तर त्यास सामाजिक माध्यमेच उत्तरदायी असतील.

Dublin Riots : शरणार्थी मुसलमानाच्या आक्रमणामुळे डबलिनमध्ये हिंसाचार !

लहान मुलांवर आक्रमण झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ २०० लोकांच्या हिंसक जमावाने केलेल्या आक्रमणात १३ दुकानांना आग लावण्यात आली. कट्टर राष्ट्रवादी गटाने केलेल्या या हिंसाचारात पोलिसांची ११ वाहने, ३ बस आणि १ ट्राम यांनाही आग लावण्यात आली.

अकबरुद्धीन ओवैसी यांनी आसाममध्ये पोलिसांना धमकी दिली असती, तर ५ मिनिटांत त्यांचा हिशेब करण्यात आला असता ! – हिमंत बिस्व सरमा, मुख्यमंत्री, आसाम

एम्.आय.एम्.चे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी तेलंगाणाची राजधानी भाग्यनगर येथे निवडणुकीच्या प्रसारसभेत पोलिसांना धमकी दिली होती. त्यावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.

अवैध ठरवलेल्या विधेयकांवर निर्णय घ्या !

राज्यपाल त्यांच्या अधिकारांचा वापर कायदा बनवण्याच्या सामान्य मार्गाला खीळ घालण्यासाठी करू शकत नाहीत – सर्वोच्च न्यायालय

पाकिस्तानी प्रशासनाने पाडले सिंध प्रांतातील श्री हिंगलाजमाता मंदिर !

भारतात एखाद्या अनधिकृत मशिदीविषयी असे करण्याचे धाडस प्रशासन कधीतरी दाखवू शकते का ?

गीर्ट विल्डर्स नेदरलँड्सचे पंतप्रधान बनणार !

अ‍ॅम्स्टरडॅम येथील ‘फ्रिडम पार्टी’ने सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक ३७ जागा जिंकल्यामुळे पक्षाचे अध्यक्ष गीर्ट विल्डर्स पंतप्रधान बनणार आहेत. त्यासाठी त्यांना अन्य राजकीय पक्षाशी युती करावी लागणार आहे.

कर्नाटकमधील सरकारी शाळेत ब्राह्मण विद्यार्थिनीला माध्यान्ह भोजनात अंडे खाण्यास भाग पाडले !

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदुविरोधी घटना सतत घडू लागल्या आहेत. काँग्रेसला निवडून दिल्यास काय होते ?, हे हिंदूंना आतातरी कळेल का ?