दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : अत्याचार करणार्‍या शेतमालकावर गुन्हा नोंद !; डोक्यात सळई पडून ९ वर्षीय मुलाचा मृत्यू…

शेतात कामाला आलेल्या १९ वर्षीय तरुणीवर ५० वर्षीय शेतमालकाने वारंवार अत्याचार केले. या प्रकरणी शेतमालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अहिल्यानगर येथील श्री कानिफनाथ देवस्थान येथील मारहाणप्रकरणी धर्मांधांवर कठोर कारवाई करावी !

राहुरी, जिल्हा अहिल्यानगर येथील गुहा गावातील श्री कानिफनाथ देवस्थानामध्ये मुसलमानांकडून वारकर्‍यांवर आक्रमण करण्यात आले होते.

Banish ‘Sunburn’ Festival Totally From Goa ! : ‘सनबर्न’ महोत्सवाला गोव्यातून कायमचे हद्दपार करा !

गोव्याची युवा पिढी व्यसनाधीन होऊन पाश्चात्त्य विकृतीच्या आहारी गेली, तर ते योग्य होणार नाही. ‘सनबर्न’चे आयोजन करणे, हा संस्कृतीद्रोह आहे. गोमंतकीय संस्कृतीचे रक्षण करणे, हे आपले दायित्व आहे.

मागील १० वर्षांत बलात्कार आणि विनयभंग घटनांमध्ये दुपटीहून वाढ !

वर्ष २०१३-२०२२ या १० वर्षांच्या काळात मुंबईतील बलात्कार आणि विनयभंग यांच्या घटना दुपटीहून अधिक वाढल्या आहेत. वर्ष २०१३ मध्ये मुंबईत बलात्काराच्या ३९१ घटना घडल्या होत्या, तर विनयभंगाच्या १ सहस्र १३७ घटना होत्या.

दिंडीसाठी ‘प्लॉट’ वाटपाच्या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल ! – उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

एका दिंडीला केवळ ३ दिवस ‘प्लॉट’ (जागा) देणे अपेक्षित आहे. त्यामुळे ६५ एकर मधील प्लॉट कायमस्वरूपी निश्चित करून त्यांची नोंद करण्यात यावी आणि भाविकांना वारी कालावधीमध्ये नित्यनेम करण्यासाठी सहकार्य करावे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊस दरासाठी ‘रस्ता बंद आंदोलन’ : प्रवाशांचे हाल !

प्रतिटनासाठी ३ सहस्र ५०० रुपयांच्या मागणीसाठी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २३ नोव्हेंबरला सकाळी १० वाजल्यापासून पुणे-बेंगळुरू महामार्गावर ‘रस्ता बंद आंदोलन’ चालू केले.

Goa Mining Issue : खाण क्षेत्रांच्या लिलाव प्रक्रियेला गती द्या ! – मुख्यमंत्र्यांचे निर्देश

सर्व ८६ खाण क्षेत्रांचा ३ मासांच्या आत लिलाव केला जाणार असल्याचे सरकारने जानेवारी मासात घोषित केले होते; मात्र आतापर्यंत केवळ ९ खाण क्षेत्रांचा लिलाव झालेला आहे. ही प्रक्रिया अत्यंत संथ गतीने चालू आहे.

मुंबई विद्यापिठास ‘वर्ग १’ विद्यापिठाचा दर्जा !

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मुंबई विद्यापिठास ‘वर्ग १’ विद्यापिठाचा दर्जा देण्यात आला आहे. राज्यात सर्वाधिक ‘नॅक’कडून (NACC) ‘अ++’ श्रेणी आणि ३.६५ ‘सी.जी.पीए.’ गुणांकन असलेल्या मुंबई विद्यापिठास ‘वर्ग १’ ग्रेडेड ऑटोनॉमीचा (स्वायत) दर्जा देण्यात आला आहे.

तुळजापूर (धाराशिव) मंदिरातील सशुल्क दर्शन बंद करण्याची मागणी !

अशी मागणी भाविकांना का करावी लागते ? मंदिरात योग्य नियम असण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात हवीत !

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी महाराष्ट्र सरकारची नवीन योजना !

परदेशातील उच्च शिक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने ‘परदेश शिष्यवृत्ती’ नावाची योजना आणली आहे. या योजनेचा सर्वाधिक लाभ मुसलमानांना मिळणार आहे.