माता अमृतानंदमयी, प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, योगी आदित्‍यनाथ आदी मान्‍यवर बँकॉकमध्‍ये होणार्‍या ‘वर्ल्‍ड हिंदु काँग्रेस’ला संबोधित करणार !

२४ ते २६ नोव्‍हेंबर या कालावधीत येथे ‘वर्ल्‍ड हिंदु काँग्रेस २०२३’चे आयोजन करण्‍यात आले आहे. या तीन दिवसीय वैचारिक मेळाव्‍यासाठी जगभरातील विविध क्षेत्रांत कार्यरत हिंदूंना निमंत्रित करण्‍यात आले आहे.

‘Indrayani’ In Danger : लाखो वारकर्‍यांचे श्रद्धास्‍थान असलेली इंद्रायणी नदी ऐन दीपावलीत प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रदूषणाच्‍या विळख्‍यात !

गणेशोत्‍सवाच्‍या वेळी पाणी प्रदूषणाची ओरड करणारे कथित पर्यावरणवादी आणि अंनिस आता गप्‍प का ?

मराठा आंदोलनविरोधी वक्‍तव्‍य करणारे विजय वडेट्टीवार यांना धमकी !

धमकी मिळाल्‍यावर विजय वडेट्टीवार यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून सुरक्षा वाढवण्‍याची मागणी केली आहे.

सरकारला जागे करण्‍यासाठी किसान सभेद्वारे जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !

बीड जिल्‍ह्यातील शेतकर्‍यांना दुष्‍काळी अनुदान मिळत नाही, तसेच पीक विम्‍याचेही पैसे जमा होत नसल्‍याने किसान सभेने आंदोलनाची चेतावणी दिली होती. त्‍यानुसार जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्‍यात आले.

पुणे येथील ‘ससून’ रुग्‍णालयाच्‍या अधिष्‍ठातापदी डॉ. विनायक काळे !

अधिष्‍ठाता पद रिक्‍त झाल्‍याने आधीचे अधिष्‍ठाता डॉ. विनायक काळे यांना पुनर्नियुक्‍तीचे आदेश मुंबई उच्‍च न्‍यायालयाने दिले होते.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेकडून ‘रात्र स्‍वच्‍छता मोहिमे’त २८१ टन कचरा संकलित !

महापालिका आयुक्‍त तथा प्रशासक सुनील पवार यांच्‍या नियोजनानुसार आणि उपायुक्‍त राहुल रोकडे, उपायुक्‍त वैभव साबळे आणि उपायुक्‍त स्‍मृती पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम पार पडली.

बीड येथे ऐन दिवाळीत केली पोलिसांनी धरपकड; बीड जाळपोळ प्रकरणी १८१ जणांची दिवाळी कारागृहात !

काही जण पोलीस कोठडीत, तर काही कारागृहात आहेत. त्‍यामुळे या आरोपींना दिवाळी कारागृहात साजरी करण्‍याची वेळ आली आहे. विशेष म्‍हणजे या घटनांमध्‍ये पोलिसांनी आणखी ४०० जणांची ओळख पटवली आहे.

महापालिकेची कचरा आगाराची २ एकर गायरान भूमी धर्मांधांनी विकली !

असे धाडस धर्मांध कुणाच्‍या जोरावर करतात ? असे करत असतांना प्रशासनाला कळत कसे नाही ? कि प्रशासनातील कुणी सहभागी आहेत का ? हे शोधले पाहिजे !

सी.आर्.झेड. क्षेत्रांतर्गत राजापूर येथे बजावण्यात आलेल्या नोटिसा रहित कराव्यात !

सहस्रोंहून अधिक लोकांना प्रशासनाने सी.आर्.झेड. कायद्यांतर्गत कारवाई करण्याविषयी नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

तरुणाची ४ लाख ५६ सहस्र रुपयांची ऑनलाईन फसवणूक : तिघांविरोधात गुन्हा नोंद

नोकरी पाहिजे असल्यास दोन पगार एच्. आर्. ला द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर अभिषेकने दिलेल्या बँक खात्यात ४ लाख ५६ सहस्र २२५ रुपये पाठवले होते.