पुणे – रेल्वेमध्ये तिकीट पडताळणी पदावर नोकरी लावण्याचे आमीष दाखवून निवृत्त लष्करी सैनिकाची १७ लाख २७ सहस्र रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी महिला आणि साथीदार यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. संजीवनी पाटणे आणि शुभम मोड अशी त्यांची नावे आहेत. आरोपी संजीवनी पाटणे हिने निवृत्त सैनिकाला रेल्वेमध्ये तिकीट तपासनीस असल्याचे खोटे सांगितले. तक्रारदारांच्या नातेवाईकांना रेल्वेत नोकरी लावतो, असे सांगून तसेच नियुक्तीची बनावट कागदपत्रे पाठवून त्यांच्याकडून पैसे घेतले. नोकरी न मिळाल्याने विचारणा केल्यावर आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावरून फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
संपादकीय भूमिका
|