अग्निवीर प्रशिक्षण घेणार्‍या तरुणीची नैराश्यामुळे आत्महत्या !

अग्निवीर प्रशिक्षण घेणार्‍या २० वर्षीय तरुणी अपर्णा नायर यांनी मालाड येथे आत्महत्या केली. नौदलाच्या आय.एन्.एस्. हमला येथे हा प्रकार घडला.

उत्तरकाशी बोगद्यातील कामगारांची १७ दिवसांनंतर यशस्वी सुटका !

येथील सिल्कियारा बोगद्यात गेल्या १७ दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांना २८ नोव्हेंबरच्या सायंकाळी उशिरा टप्प्याटप्प्याने बाहेर काढण्यात आले.

हसतमुख अन् सर्वांशी जवळीक साधणारे चि. राजेंद्र दुसाने आणि प्रेमळ अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्‍या ६० टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. दीपाली माळी !

सनातनचे साधक चि. राजेंद्र दुसाने आणि साधिका चि.सौ.कां. दीपाली माळी यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

जगभरात युवा पिढीत शाकाहार करण्याच्या प्रमाणात वृद्धी ! – अमेरिकी संशोधन

सर्वेक्षणानुसार अधिक लोकांतील गोमांस खाण्याचे प्रमाण अल्प झाले आहे ,कोंबडीच्या मांसापेक्षा गोमांसाचा व्यवसाय तब्बल १० पट अधिक हानीकारक वायूंचे उत्सर्जन करतो.

सर्वेक्षण अहवाल सादर करण्यासाठी मागितला ३ आठवड्यांचा वेळ

ज्ञानवापीचा सर्वेक्षण अहवाल न्यायालयात सादर करण्याची मुदत अनेक वेळा वाढवण्यात आली आहे. अहवाल न्यायालयात सादर केल्यानंतर ‘ज्ञानवापी संकुलात नेमके काय आहे ?’, हे कळणार आहे.

शनिशिंगणापूर येथे कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात शनिभक्तांकडून बेमुदत आमरण उपोषणाची घोषणा  !

शनिशिंगणापूर देवस्थानमधील विश्‍वस्त मंडळाकडून गैरकारभार चालू असून हे मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा. चौकशीसाठी समिती गठीत करावी आणि दोषींवर फौजदारी गुन्हे नोंद करावेत.  

ओझर येथे मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिर परिषदेत ‘वक्फ कायद्या’द्वारे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण आणि मंदिरे बळकावणे यांवर उपाय, मंदिर परिसरात मद्य-मांस बंदी; दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णोद्धार आदी विषयांवर चर्चा होणार आहे.

हिंदूंच्या पुनरुत्थानासाठी आयोजित ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’मधील उद्बोधक विचार !

राजकारणाविषयी असलेली उदासीनता ही हिंदूंमध्ये सामान्य आहे. यातून महाभारताच्या काळात अगदी अर्जुनसुद्धा सुटलेला नाही. युद्धाच्या ऐन मोक्यावर अर्जुन त्याच्या हातातील शस्त्रे खाली ठेवणार होता. त्याला वाटले की, राजकारण हे अप्रासंगिक आहे. त्याच्या मनात याविषयी भ्रम निर्माण झाला.

उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाकडून आय.एस्.आय.च्या २ हस्तकांना अटक

अशा देशद्रोह्यांना तत्काळ फाशीची शिक्षा देण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

New Zealand Smoking : न्यूझीलंड सरकार तंबाखू आणि सिगारेट यांवरील बंदी उठवणार !

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये न्यूझीलंडमधील तत्कालीन  सरकारने तंबाखू आणि सिगारेट यांच्यावर बंदी घालणारा ऐतिहासिक कायदा केला होता. असे असले, तरी आताच्या नवीन सरकारने ही बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे.