गोवंशियांना हत्येसाठी घेऊन जाणारा ट्रक अडवणारे बजरंग दलाचे वाघेश्वर अडके यांच्यावर गोतस्करांचे आक्रमण !

(प्रतिकात्मक चित्र)

सातारा – २० नोव्हेंबरला काही गोतस्कर एका ट्रकमधून ४० म्हशी कत्तलीसाठी घेऊन जात होते. हा ट्रक गोरक्षक वाघेश्वर अडके यांनी अडवला असता २ अज्ञात तस्करांनी अडके यांच्यावर चाकूने आक्रमण केले. यात अडके हे घायाळ झाले आहेत. या संदर्भात फलटण पोलीस ठाण्यात २ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ‘ऑपइंडिया’या संकेतस्थळाने केलेल्या पडताळणीत हा ट्रक तौफिक कुरेशी यांच्या नावावर  आहे.

या संदर्भात गोरक्षक श्री. अक्षय म्हणाले, ‘‘गेल्या ३ मासांत गोरक्षकांवर झालेले हे दुसरे आक्रमण आहे. तरी या संदर्भात प्रशासनाने तात्काळ पावले उचलणे अपेक्षित आहे.’’ (राज्यात गोवंशहत्या बंदी कायदा असतांना गोरक्षकांवर जीवघेणी आक्रमणे होत आहेत. यावरून गोतस्करीच्या समस्येची भीषणता किती आहे ? हे लक्षात येते. प्रशासन गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही कधी करणार ?  – संपादक)

संपादकीय भूमिका

गोरक्षकांना सुरक्षितता प्रदान करणे आणि गोवंशियांचे रक्षण करणे, यांसाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अनिवार्य आहे ! गोवंशहत्या बंदी कायदा असतांना गोरक्षक असुरक्षित असणे संतापजनक आहे ! गोरक्षकांवर जीवघेणे आक्रमण करणार्‍यांना त्वरित कठोर शिक्षा होण्यासाठी गोरक्षकांनी प्रयत्न करावेत !