कोयना धरण पाणी अडवणूक प्रकरणी प्रसंगी त्यागपत्र ! – संजयकाका पाटील, खासदार, भाजप

सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून सांगली जिल्ह्याच्या हक्काचे पाणी देण्यात येत नाही. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे सांगलीला पाणी मिळत नाही.

हडपसर (पुणे) विधानसभा मतदारसंघातील ‘महंमदवाडी’ या उपनगराचे नाव ‘महादेववाडी’ करण्याची शिवसेनेची मागणी !

हडपसर परिसरातील हंडेवाडी येथे प्रभु श्रीराम यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावाला राज्याच्या नगरविकास विभागानेही सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने ५१ सहस्र दिव्यांनी उजळला पंचगंगा घाट !

पौर्णिमेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज पुलास आकर्षक विद्युत् रोषणाई करण्यात आली होती. शहरात जवळपास प्रत्येक मंदिरात स्थानिक भाविकांनी दीपोत्सव साजरा केला.

वाशी येथे २२ व्या मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन !

१ ते ४ डिसेंबर या कालावधीत हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे, अशी माहिती बी.ए.एन्.एम्.चे अध्यक्ष वसंत भद्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रामायण-महाभारतातील कूटनीतीचा वापर परराष्ट्र धोरणात हवा ! – डॉ. जयशंकर, परराष्ट्रमंत्री

पुणे येथील ‘भारताची धोरणात्मक संस्कृती’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन !

पुणे येथील ‘ससून’ रुग्णालयामधील औषध खरेदीसाठी निधीची कमतरता !

या संदर्भात राज्यशासनाने त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे ! दैनंदिन वापराच्या औषधांचा रुग्णालयामध्ये तुटवडा असणे, ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे.

अंतरवाली सराटी येथील हिंसाचारात सहभागी ४३ जणांचा शोध चालू !

अंतरवाली सराटी येथे झालेल्या दगडफेक प्रकरणी ३०० हून अधिक जणांवर गुन्हे नोंद झालेले आहेत. आतापर्यंत तिघांना अटक झाली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चर्चेनंतरच महायुतीच्या जागा वाटपाचे सूत्र ठरेल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

राज्यात भाजप लोकसभेच्या २६ जागा, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मिळून २२ जागा देण्यात येणार असल्याची चर्चा चालू आहे.

सातारा येथे अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत !

पाण्यासमवेत गाळ वाहून आल्यामुळे नागरिकांच्या घरात घोट्याएवढा चिखल साचला होता. सातारा शहराच्या काही भागाला पाणीपुरवठा करणार्‍या कोटेश्वर टाकीमध्ये बाजूच्या ओढ्याचे पाणी शिरल्यामुळे सकाळी पाणीपुरवठा विस्कळीत झाला.

उर्दू शाळांमध्ये अरबी भाषा शिकणे सक्तीचे करण्याची मागणी !

‘ऑल इंडिया उलेमा बोर्डा’च्या (मंडळाच्या) कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये उर्दू शाळांमध्ये अरबी भाषा शिकणे सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला