बंगालमध्ये ‘जय श्रीराम’ म्हणणार्‍या ७ वर्षीय विद्यार्थ्याला शिक्षकाकडून मारहाण

बंगाल भारतात आहे कि पाकिस्तानात ! तृणमूल काँग्रेसच्या राज्यातील मोगलाई ! येथील श्री रामकृष्ण विद्यालयात शिकणार्‍या कु. आर्यन सिंह नावाच्या एका ७ वर्षीय विद्यार्थ्याला शाळेच्या आवारात ‘जय श्रीराम’ म्हटल्याने त्याच्या शिक्षकाने बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली.

केंद्र संचालकासह शिक्षकांवर फौजदारी गुन्हे नोंद करा ! – शिक्षण मंडळाचे शिक्षणाधिकार्‍यांना आदेश

सरस्वती भुवन शिक्षणसंस्थेच्या सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील स.भु. हायस्कूलमध्ये दहावीच्या गणित विषयात झालेल्या सामूहिक कॉपी प्रकरणात सहभागी केंद्र संचालकासह ३ शिक्षकांवर फौजदारी गुन्हे नोंद करावेत, असा आदेश माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिला आहेत.

शाहूवाडी (कोल्हापूर) येथे हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर मुख्याध्यापकांकडून क्षमायाचना

शाहूवाडी तालुक्यातील एका माध्यमिक विद्यालयात २६ जून या दिवशी शाहू जयंतीच्या निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात हिंदूंच्या देवता आणि ब्राह्मण यांच्यावर टीका करण्यात आली.

अध्यक्षांसमोरील मोकळ्यात जागेत जाऊन विरोधकांचा गोंधळ

विधानसभेत २१ जूनला शिक्षकांच्या उपोषणाच्या प्रश्‍नावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद झाला.

आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांच्या ७ व्या वेतन आयोगाविषयी १० दिवसांत निर्णय ! – आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके

आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांच्या वेतनाविषयी येत्या १० दिवसांत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांनी १९ जूनला विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या वेळी दिली.

मिठीबाई महाविद्यालयाच्या प्राचार्यांना लैंगिक छळाप्रकरणी अटक करण्यासाठी आंदोलन

मिठीबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजपाल हांडे यांच्यावर लैंगिक छळ केल्याचे आरोप असूनही त्यांना अटक केली नसल्याच्या विरोधात आणि प्राचार्य पदावरून हटवण्याविषयी प्रहार विद्यार्थी संघटना आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांच्या विद्यार्थी संघटनांनी ‘बोंब मारो आंदोलन’ केले.

शाळेच्या पहिल्याच दिवशी अनुदानासाठी शिक्षकांचे आंदोलन

राज्यातील सर्व शाळांना शंभर टक्के अनुदान मिळावे या मागणीसाठी राज्यातील शेकडो शिक्षक १७ जून या दिवशी आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. राज्य कायम विनाअनुदानित-अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

सांगली महापालिकेतील शाळांमध्ये शाळेच्या वेळेत शिक्षकांना भ्रमणभाष वापरण्यास बंदी !

महापालिका शाळांची गुणवत्ता वाढावी, तसेच शिक्षकांचे लक्ष पूर्णत: विद्यार्थ्यांवर केंद्रीत रहावे यांसाठी शाळेच्या वेळेत शिक्षकांना भ्रमणभाष वापरण्यास बंदी असेल, असा निर्णय महापौर सौ. संगीता खोत यांनी घोषित केला.

नवी मुंबई येथील शिक्षकांसाठी ‘तणावमुक्तीसाठी साधना’ शिबिर 

सध्या अतिमहत्त्वाकांक्षा, हव्यास आणि चुकीची मूल्ये समाजात रुजली आहेत. जागतिकीकरण, माहिती तंत्रज्ञान, अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांचा नकारात्मक परिणाम शिक्षकांवरही होत आहे. त्यामुळे शिक्षकांनाही शिकवतांना दडपण येते.

भारतीय सैन्यात प्रथमच ख्रिस्ती धर्मगुरूंची नेमणूक

ख्रिस्ती पाद्रयांचा धर्मांतराचा इतिहास पहाता, त्यांनी सैन्यातही असा उपद्रव केल्यास त्याला उत्तरदायी कोण ? रुग्णांना ‘भेटी’ देण्याच्या नावाखाली ख्रिस्ती धर्मगुरु त्यांचे धर्मांतर करणार नाहीत कशावरून ? ख्रिस्ती पाद्रयांचा इतिहास तरी हेच सांगतो ?


Multi Language |Offline reading | PDF