दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पाणीटंचाईची समस्‍या तशीच !; ३४ लाख ३२ सहस्र रुपयांची फसवणूक !…

ससून रुग्‍णालय अमली पदार्थ प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि ड्रग्‍ज माफिया ललित पाटील याला ७ नोव्‍हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्‍यात आली आहे. तो सध्‍या पुणे पोलिसांच्‍या कह्यात आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना विविध निवेदने सुपुर्द

शिवराजेश्वर मंदिराला मिळणार्‍या निधीत वाढ करण्यासह जिल्ह्यातील अमली पदार्थ व्यवसायाच्या विरोधात कृती करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याचे आश्वासन

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विरोधात अवमान याचिका प्रविष्ट करणार ! – महाराष्ट्र पारंपरिक मूर्तीकार आणि हस्तकला कारागीर संघ

न्यायालयाने ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींवर बंदी घातली आहे. त्यामुळे पारंपरिक मूर्तीकारांनी मातीच्या मूर्तींची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली

थिवी येथील कोमुनिदाद भूमीतील अनधिकृत ‘लाला की बस्ती’वर बुलडोझर अटळ !

याचिकादार अयुब खान यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या, तेव्हा उदय भेंब्रे झोपले होते का ? : श्री. नितीन फळदेसाई

मडगावमधील सभेत हिंदुत्वनिष्ठांवर टीका करणारे अधिवक्ता भेंब्रे यांच्या विधानांवर राष्ट्रीय बजरंग दलाचे श्री. नितीन फळदेसाई यांचा प्रतिप्रश्न !

भूमी बळकावल्याच्या प्रकरणांचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द

गोवा राज्यातील बहुचर्चित भूमी बळकावल्याच्या प्रकरणांचे अन्वेषण करण्यासाठी सरकारने निवृत्त न्यायाधीश व्ही.के. जाधव यांच्या एक सदस्यीय आयोगाची स्थापना केली होती.

ए.टी.एम्.मधील रक्‍कम चोरणार्‍यांना अटक !

नगर जिल्‍ह्यातील ए.टी.एम्. यंत्रामधील रक्‍कम चोरणार्‍या ४ आरोपींना माढा येथे रोख रकमेसह अटक झाली. अन्‍य एका आरोपीचा शोध चालू आहे.

पुणे वाहतूक पोलिसांकडून ८५ सहस्र वाहनचालकांवर कारवाई !

वाहतुकीचे नियम अजूनही पाळले न जाणे, म्‍हणजे आतापर्यंतच्‍या सर्वपक्षीय शासनकर्त्‍यांनी जनतेला शिस्‍त न लावल्‍याचा परिणाम !

सातारा जिल्‍ह्यातील वाई आणि खंडाळा तालुके दुष्‍काळग्रस्‍त घोषित !

सातारा जिल्‍ह्यातील माण आणि खटाव हे नेहमीच दुष्‍काळग्रस्‍त तालुके म्‍हणून ओळखले जातात; पण तरीही राज्‍य मंत्रीमंडळाच्‍या बैठकीमध्‍ये पहिल्‍या टप्‍प्‍यात माण आणि खटाव या तालुक्‍यांचा समावेश करण्‍यात आलेला नाही.

‘स्‍टुडंट्‌स फेडरेशन ऑफ इंडिया’कडून पुणे विद्यापिठात विद्यार्थ्‍यांना मारहाण !

या वेळी काही विद्यार्थ्‍यांनी सदस्‍यता करण्‍यास नकार दिल्‍यानंतर एस्.एफ्.आय. आणि लोकायतच्‍या गुंडांनी विद्यार्थ्‍यांना मारहाण केल्‍याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे.