एका युवतीला त्रास देणार्या २ युवकांना साधिकेने गुरुदेव आणि ईश्वर यांच्याप्रतीच्या श्रद्धेच्या बळावर स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गात शिकवल्यानुसार विरोध करून त्या युवतीला युवकांच्या कचाट्यातून सोडवणे
मला स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे प्रकार परिपूर्ण येत नाहीत, तरीही गुरुदेव, आई भवानी आणि श्रीकृष्ण यांच्या कृपेमुळे मी त्या दोन युवकांना विरोध करू शकले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘आपल्याला स्वसंरक्षण प्रशिक्षण किती उत्तम येते. त्यापेक्षाही आपली गुरु आणि ईश्वर यांच्यावरील भक्ती अन् श्रद्धा महत्त्वाची आहे.