संपादकीय : दान आणि भीक !
हिंदु धर्मानुसार दानाला मोठे महत्त्व आहे. अन्नदान, धनाचे दान, वस्तूंचे दान, सुवर्ण दान, गोदान, ज्ञानदान आणि सर्वांत शेवटी प्राणाचे दान हे काही दानांचे प्रकार आहेत. ‘दान केल्याने पुण्य मिळते आणि पापांचे क्षालन होते’, असे शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे.