शिर्डीत साईबाबांना १५ लाख रुपयांचा हिरेजडित ‘ब्रोच’ अर्पण
देहलीतील अज्ञात साईभक्ताने श्री साईबाबा यांच्या चरणी अनुमाने १५ लाख रुपये किमतीचा हिरेजडित मोरपिसांच्या आकारातील ब्रोच (मोरपिसाच्या आकाराची वस्तू) अर्पण केला आहे. अनुमाने ८० ग्रॅम वजनाच्या या ब्रोचमध्ये मौल्यवान ‘ब्राऊन डायमंड’ (तपकिरी हिरा) जडवण्यात आला आहे.