पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २ जानेवारी (वार्ता.) – मंदिरांवरील, तसेच मंदिराच्या भूमीवरील अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावीत, या मागणीसाठी प्रत्येक आठवड्याला ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त शेकडो मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला होता. या अनुषंगाने ३१ डिसेंबर या दिवशी पंढरपूर येथील संत नामदेव महाराज पायरी या ठिकाणी ‘सामूहिक आरती’ मोठ्या उत्साहाने आणि भावपूर्ण वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली, अशी माहिती ‘मंदिर महासंघा’चे सदस्य श्री. विनोद रसाळ यांनी दिली आहे.
🕉️ ‘Collective Aarti at Every Temple’ organised at Namdev Pyari, Mahadwar in Pandharpur, Solapur 🪔 🛕
As resolved at the 3rd Maharashtra Mandir Nyas Parishad in Shirdi, this campaign aims to bring people together in devotion#ReclaimTemples@SG_HJS pic.twitter.com/0IAz4dVuc5
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 3, 2025
या वेळी पंढरपूर येथील ‘वारकरी संप्रदाय पाईक संघा’चे संस्थापक ह.भ.प. देवव्रत (राणा) महाराज वासकर आणि राष्ट्रीय प्रवक्ते ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, तसेच ह.भ.प. शाम महाराज उखळीकर, ह.भ.प. रघु महाराज कबीर, ह.भ.प. नागेश महाराज बागडे, ह.भ.प. दर्शन महाराज बडवे, ह.भ.प. बाबाराव बडवे महाराज, इस्कॉनचे नागेश दास, तसेच सर्वश्री महेश खिस्ते, सौरभ थिटे, वैभव बडवे, बाळासाहेब डिंगरे, महेशाचार्य उत्पात, विठ्ठल बडवे, हरीकाका कुलकर्णी, रविकाका क्षीरसागर, श्रीराम बडवे, सचिन लादे, वैभव बडवे, दिलीप बडवे, मयूर बडवे, उदय इंदापूरकर, अधिवक्ता आशुतोष बडवे, रामेश्वर कोरे, ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ राज्य कोर ग्रूप’ सदस्य श्री. गणेश लंके, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. विनोद रसाळ, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांच्यासह मोठ्या संख्येने विविध मंदिरांचे विश्वस्त, वारकरी मंडळी आणि भाविक उपस्थित होते.