
ढाका – बांगलादेशातील अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार महंमद युनूस हे चीनने पाठवलेल्या जेट विमानातून बिजिंग दौर्यावर गेले आहेत. चीनशी जवळीक साधून भारताला डिवचण्याचा प्रयत्न बांगलादेश करत असल्याचे बोलले जात आहे.
१. बांगलादेशाच्या स्वातंत्र्यदिनी देशात न थांबता युनूस थेट बिजिंग दौर्यावर गेले आहेत. ‘महंमद युनूस यांनी त्यांच्या पहिल्या विदेशी दौर्यासाठी चीनची निवड केली आणि यातून बांगलादेश एक प्रकारचा संदेश देत आहे’, अशी प्रतिक्रिया बांगलादेशाच्या परराष्ट्र विभागातील उच्चपदस्थ अधिकारी महंमद जाशिम उद्दीन यांनी व्यक्त केली आहे.
२. चीनचे आधीपासूनच बांगलादेशासमवेत व्यापारी संबंध असून ते अधिकाधिक वृद्धींगत करण्याचा प्रयत्न चीनकडून केला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे महंमद युनूस यांनी पदभार स्वीकारल्यापासून चीनमधील किमान १४ आस्थापनांनी बांगलादेशामध्ये गुंतवणूक केली आहे.
३. बांगलादेशामध्ये चीनची वाढती गुंतवणूक भारतासाठी काळजीचा विषय ठरण्याची शक्यता आहे. शेजारी देशाच्या पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रात चीनचा वावर भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो.
संपादकीय भूमिका
|