मंदिर परिसरात व्यवसाय करण्याची संधी केवळ श्रद्धाळू आणि देवाला मानणार्‍यांनाच द्या ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

भादोले (कोल्हापूर) येथे  हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी ४०० हून अधिक हिंदूंची उपस्थिती !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करतांना प.पू. देव सेवानंद महाराज, डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे आणि श्री. किरण दुसे

कोल्हापूर – मंदिराचा परिसर, यात्रा, उत्सव आणि अन्य ठिकाणी व्यवसायाच्या निमित्ताने अन् वस्तू विक्रीच्या निमित्ताने अहिंदूंच्या माध्यमातून नवे आक्रमण चालू झाले आहे. एकीकडे हिंदूंना संधी न मिळाल्याने ते बेरोजगार रहातात, तर दुसरीकडे मूर्तीपूजेवर विश्वास नसणारे अहिंदु मंदिर परिसरात दुकाने लावतात. महत्त्वाचे म्हणजे आपला पैसा धर्मविरोधी लोकांना का द्यायचा ? याचाही हिंदूंना विचार करावा लागणार आहे. त्यामुळे मंदिर परिसरात व्यवसाय करण्याची संधी केवळ श्रद्धाळू आणि देवाला मानणार्‍यांना दिली पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले.

ते ३० डिसेंबर या दिवशी भादोले (तालुका हातकणंगले) येथील बिरदेव मंदिरात हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते. या प्रसंगी सनातन संस्थेच्या डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांनीही उपस्थितांना संबोधित केले. या सभेसाठी ४०० हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते.

सभेसाठी उपस्थित जिज्ञासू, मान्यवर

आपल्या मार्गदर्शनात डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांनी धर्मपालन आणि धर्माचरण यांचे महत्त्व यांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. सभेचे सूत्रसंचालन श्री. दयानंद पाटील यांनी केले, तर प्रस्तावना हिंदुत्वनिष्ठ श्री. विजय खुपेरकर यांनी केली. सभेमध्ये ह.भ.प. बाळासाहेब दुधगावकर, ह.भ.प. रामदास सुतार, भादोले येथील ‘रामकृष्ण विवेकानंद सेवाकेंद्रा’चे प.पू. देव सेवानंद महाराज, लक्ष्मीवाडी येथील सप्तकोटी विश्वेश्वर मंदिराचे मठाधिपती सद्गुरु अतुल काजवे यांचा सत्कार करण्यात आला.

सभेसाठी उपस्थित मान्यवर

आभार 

सभेसाठी बीरदेव मंदिर उपलब्ध करून दिल्याविषयी धनगर समाजाचे आभार मानण्यात आले.

विशेष

१. सभेच्या बैठकीच्या कालावधीत कुंकू लावण्याचे महत्त्व ऐकल्यावर १४ ते १८ वर्षे वयोगटातील ४५ मुली कुंकू लावून आल्या होत्या. सभेचा विषय ऐकून त्यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षणाची मागणी केली.

२. धर्मप्रेमी सौ. माधुरी सुतार यांनी गावातील सर्व महिलांना एकत्र येण्यासाठी उद्युक्त केले.

३. ‘श्री गणेश डेकोरेटर’चे श्री. विनोद पाटील यांनी मंडप आणि ध्वनीयंत्रणा उपलब्ध करून दिली.

उपस्थित मान्यवर 

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. वसंतराव माने, श्री. वैभव पाटील, माजी सरपंच सौ. आशा पाटील, श्री. सुधाकर पाटील, भाजप उपाध्यक्ष विनोद पाटील, विश्व हिंदु परिषदेचे श्री. संतोष पाटील, बजरंग दलाचे अध्यक्ष श्री. सुहास पाटील.

सभा यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न 

ही सभा यशस्वी होण्यासाठी माजी पंचायत समिती सदस्या सौ. मीनाक्षी पाटील, ‘ग्राम बचतगट समिती’ समन्वयक सौ. सुलोचना पाटील, सौ. माधवी सुतार, सौ. दीपाली पाटील, सौ. गीता कोळी, सौ. अलका माने, ‘विश्व हिंदु परिषद-दुर्गा वाहिनी’च्या वंशिका पाटील, उत्कर्षा भोसले, वैष्णवी भोसले, श्रावणी कोळी, आसावरी खुपेरकर, गायत्री पाटील, तनुष्का पाटील, रेवती ठाकर, ज्योती ठाकर, राजनंदिनी पाटील, श्री. सुहास पाटील, श्री. अमोल कुंभार, भद्रेश्वर मंदिराचे पुजारी श्री. केदार गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले.