सोलापूर येथे ‘हिंदु एकता दिंडी’त घडले हिंदूसंघटनाचे दर्शन !
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’च्या अंतर्गत सोलापूर येथे २८ मे या दिवशी काढलेल्या हिंदु एकता दिंडीत हिंदु बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन ‘हिंदु राष्ट्रा’चा जयघोष केला. या दिंडीत सहस्रोंच्या संख्येने जनसमुदाय लोटला.