Chandrakant Khaire : पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांचा संप्रदाय अद्याप संपला नाही !

आसारामजी बापू अजून दोषी सिद्ध झाले नसल्याचा चंद्रकांत खैरे, माजी खासदार यांचा दावा !

संतश्री आसारामजी बापू आणि चंद्रकांत खैरे, माजी खासदार

पुणे – पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यावर कथित बलात्काराच्या प्रकरणात गुन्हा नोंदवला, पुढे खटला चालू झाला. त्यानंतर त्यांच्या संप्रदायाला ओहोटी लागली. तरीही त्यांचे अनेक भक्त ‘अखिल भारतीय श्री योग वेदांत सेवा समिती’ आणि इतर संस्थांमध्ये कार्यरत आहेत. त्यांचा संप्रदाय अजूनही संपलेला नाही. देशभरात त्यांचे अनुयायी आहेत. ते सर्व त्यांची पूजा-अर्चा, सण त्याच जोमाने साजरे करतात, असे विधान उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार आणि नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. खैरे यांनी संतश्री आसारामजी बापू अजून दोषी सिद्ध झाले नसल्याचा दावा केला आहे.

संतश्री आसारामजी बापू यांना अटक झाली, त्या वेळी मी देहलीत होतो. त्यांच्या अटकेच्या विरोधात जंतरमंतर मैदानावर भक्तांनी मोठे आंदोलन केले होते. त्या वेळी मी त्यांच्या समर्थनार्थ गेलो होतो, असेही खैरे यांनी सांगितले.