वैकुंठचतुर्दशीच्या निमित्ताने कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची करण्यात आलेली विशेष रूपातील पूजा !

तिसर्‍या दिवशी किरणोत्सव नाही !

ढगाळ वातावरण, सूर्यकिरणांची तीव्रता अल्प असणे, वातावरणातील धुलीकण यांमुळे श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात तिसर्‍या दिवशी सूर्यकिरण केवळ चांदीच्या द्वारापर्यंत पोचल्याने किरणोत्सव होऊ शकला नाही.

श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात किरणोत्सवात पहिल्या दिवशी सूर्यकिरणांचा देवीच्या चरणांना स्पर्श !

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या किरणोत्सवास ९ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला. हे सूर्यकिरण देवीच्या चरणांपर्यंत पोचले. हे किरण देवीच्या चरणांवरून पुढे जाऊन देवीच्या बाजूला असलेल्या सिंहांपर्यंत पोचून पुढे लुप्त झाले.

९ ते ११ नोव्हेंबर या काळात कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात किरणोत्सव !

हा किरणोत्सव वर्षातून २ वेळा म्हणजे उत्तरायण आणि दक्षिणायन यांमध्ये होतो. उत्तरायणात तो ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारीला, तर दक्षिणायनात तो ९, १० आणि ११ नोव्हेंबरला होतो.

नरकचतुर्दशीला श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या शिखरावर काकडा प्रज्वलित करण्यास प्रारंभ !

मुख्य शिखरानंतर परिसरातील इतर देवतांपुढे काकडा फिरवून पितळी उंबर्‍यावर कापूर लावून देवीचा मुख्य गाभारा उघडला जातो. सनईचा मंद सूर आणि गायन सेवा अशा वातावरणात हा सोहळा होतो. त्यानंतर देवीची पहाटे काकड आरती होते.

लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची करण्यात आलेली विशेष अलंकार पूजा !

श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी १ कोटी १४ लाख रुपयांची देणगी !

यंदा दर्शनासाठी उच्चांकी १८ लाख भाविकांची नोंद झाली होती. यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या १२ दानपेट्यांमधून १ कोटी १४ लाख ४३ सहस्र २१० रुपयांची देणगी जमा झाली.

तिरुपती देवस्थानकडून श्री महालक्ष्मीदेवीसाठी १ लाख २८ सहस्र रुपयांचे महावस्त्र अर्पण !

तिरुपती देवस्थानकडून श्री महालक्ष्मीदेवीसाठी सोनेरी रंगाचे आणि गडद वीटकरी, लाल रंगाचे काठ असणारे १ लाख २८ सहस्र ७०० रुपयांचे महावस्त्र अर्पण करण्यात आले. हे महावस्त्र बी. शशीधर यांनी सपत्नीक येऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे सुपुर्द केले.

चित्पावन संघाच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त १० ऑक्टोबरला श्री महालक्ष्मी अष्टमी जागर सोहळा !

हा सोहळा १० ऑक्टोबरला सकाळी ९ ते रात्री १० या कालावधीत बिनखांबी गणेश मंदिराजवळ ब्राह्मण सभा करवीर येथे होणार आहे. या सोहळ्यात महापूजा, श्रींची कहाणी वाचन, आरती, महानैवेद्य, श्री देवीमूर्ती प्रतिष्ठापना यांसह घागरी फुंकण्याचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ७.३० नंतर महालक्ष्मीचे दर्शन भाविकांसाठी खुले होणार आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष मकरंद करंदीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.