J&K Encounter : कठुआ (जम्मू-काश्मीर) येथील चकमकीत ५ आतंकवादी ठार, तर ४ पोलीस वीरगतीला प्राप्त

कठुआ (जम्मू-काश्मीर) – येथे आतंकवाद्यांसमवेत झालेल्या चकमकीत ५ आतंकवाद्यांना ठार मारण्यात आले, तर त्याच वेळी ४ पोलिसांना वीरमरण आले. येथील जंगलात आतंकवादी लपल्याची माहिती मिळाल्यावर करण्यात आलेल्या कारवाईत ही चकमक झाली. येथे एकूण १० आतंकवादी लपल्याची माहिती मिळाली आहे. येथे ही चकमक अद्यापही चालू असल्याचे सांगितले जात आहे. ठार झालेले आतंकवादी जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचे सदस्य होते.

संपादकीय भूमिका

काश्मीरमध्ये कितीही आतंकवाद्यांना ठार मारले, तरी जोपर्यंत त्यांचा निर्माता, म्हणजे पाकिस्तानला भारत नष्ट करत नाही तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही. त्यामुळे भारत मुळावर कधी घाव घालणार ?