हट्टी मुले !
उठल्याबरोबर लहान मुलांच्या हातात भ्रमणभाष असतो अथवा दूरचित्रवाणी चालू करून कार्टून पाहून दिवसाचा आरंभ केला जातो. यामध्ये किती घंटे वाया जातात ? आणि त्याचा आरोग्यावर काय दुष्परिणाम होतो ? हे मुलांना समजत नसले, तरी पालकांना समजत नसेल, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.