पुदुचेरी येथे धर्मांधाने मंदिरात घुसून शिवीगाळ करत केले ‘फेसबूक’वरून थेट प्रक्षेपण

पोलिसांकडून अटक

  • हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण करणे किती महत्त्वाचे झाले आहे, हे लक्षात येते ! आतापर्यंत रात्री गुपचूप मंदिरांमध्ये घुसून मूर्तींची तोडफोड होत होती, आता थेट मंदिरात घुसून शिवीगाळ केली जात आहे, उद्या तोडफोड करण्याचे धाडस झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !
  • या घटना कायमस्वरूपी थांबवण्यासाठी हिंदूंनी २४ घंटे मंदिरांचे रक्षण करण्यासह आता हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी संघटित व्हावे !

पुदुचेरी – येथील करैकलमधील पेरूमल कोविल मार्गावरील पर्वथीस्वरार मंदिरामध्ये मंजूर अली नावाच्या व्यक्तीने प्रवेश करून छायाचित्रे काढणे आणि चित्रीकरण करणे चालू केले. त्यानंतर त्याने मूर्तींविषयी अपशब्द बोलण्यास चालू केले. या घटनेचे त्याने ‘फेसबूक’वरून थेट प्रक्षेपण चालू केले होते.

त्याला मंदिरातील पुजारी आणि उपस्थितांनी थांबण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे पुजार्‍यांनी पोलिसांना बोलावले. त्यानंतर मंजूर अली याला अटक करण्यात आली. तसेच त्याचा भ्रमणभाष जप्त केला. पोलीस अधिक चौकशी करत आहेत.