बांगलादेशात असे होत असेल तर जगातील १५७ इस्लामी देशांमध्ये, तसेच भारतात जेथे अल्पसंख्य मोठ्या प्रमाणात आहेत, तेथे काय होत आहे, याचाही शोध घ्यायला हवा, असे कुणाला वाटल्यास त्यात आश्चर्य काय ?
नवी देहली – बांगलादेशामध्ये प्रतिदिन मशीद आणि मदरसे यांमध्ये प्रतिदिन बलात्कार होत आहेत. अल्लाच्या नावावर बलात्कार होत आहेत. मदरशांतील बलात्कारी शिक्षक आणि मशिदीचे बलात्कारी इमाम यांना वाटते की, जर त्यांनी दिवसांतील पाचही वेळेचे नमाजपठण केले, तर ते या पापातून मुक्त होतील. अल्ला त्यांना क्षमा करील, असे ट्वीट बांगलादेशातून परागंदा झालेल्या लेखिका तस्लिमा नसरिन यांनी केले आहे.
Imams and Madrasa teachers have been raping children in mosques and madrasas in Bangladesh everyday. They rape in the name of Allah. They know Allah is merciful, so Allah will forgive their sins only if they pray 5 times a day. https://t.co/Yeq13ldxrb
— taslima nasreen (@taslimanasreen) December 7, 2020
तस्लिमा नसरिन सातत्याने धर्मांधांच्या विरोधात परखड मत व्यक्त करत असल्याने, तसेच बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांवर त्यांनी लिहिलेल्या ‘लज्जा’ या कादंबरीमुळे त्यांना ठार मारण्याचा फतवाही काढण्यात आलेले आहे. त्यामुळे त्या भारतात आश्रय घेऊन रहात आहेत.