सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतले अयोध्येतील रामललाचे दर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या संकल्पाला प्रभु श्रीरामाचे आशीर्वाद लाभावेत, यासाठी सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी येथील रामललाचे दर्शन घेतले.

हिंदूंची प्रार्थना फलद्रूप झाली । प्रभु श्रीरामाने रामजन्मभूमी मुक्त केली ॥

‘त्रेतायुगामध्ये रावणाने ३३ कोटी देवतांना बंधनात टाकले होते, तसेच आज कलियुगात गेल्या ७० वर्षांहून अधिक काळापासून रामजन्मभूमी बंधनात होती. अयोध्याभूमी म्हणजेच पृथ्वीवरील वैकुंठधाम आहे.

हिंदुत्वनिष्ठांनी श्रीरामाचा नामजप केल्याविना राममंदिराची स्थापना होणार नाही !

जोपर्यंत राममंदिरासाठी झटणारे कार्यकर्ते श्रीरामाचा नामजप करत नाहीत, तोपर्यंत राममंदिराची स्थापना होणार नाही. राममंदिरासाठी हिंदूंनी रामनामाचा जप करणे आवश्यक !

श्रीरामाचे नाव असलेले तोकडे कपडे घालून स्वत:चे छायाचित्र सामाजिक माध्यमांवर केले प्रसारित

वाणी कपूर यांनी अशा प्रकारे अन्य धर्मियांच्या देवतांचे नाव असलेले तोकडे कपडे घालण्याचे धाडस केले असते का ? हिंदू सहिष्णु असल्यामुळे कोणीही उठतो आणि त्यांच्या श्रद्धास्थानांचा अवमान करतो. वाणी कपूर यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालून निषेध व्यक्त केल्यास त्यातून हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करणार्‍यांना एक धडा मिळेल !

हिंदु जनजागृती समितीने आरंभलेल्या ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियाना’च्या माध्यमातून ‘रामसे बडा राम का नाम’ याची रामभक्तांनी घेतली अनुभूती !

प्रभु श्रीरामाला भक्ती-भावपूर्ण नामजपाद्वारे आळवल्यास किंवा त्याची भक्ती केल्यास राममंदिर उभारणीतील अडथळे दूर होऊ शकतील. ही भक्ती केवळ मानसिक स्तरापेक्षा आध्यात्मिक स्तरावरची हवी. हाच भाग लक्षात घेऊन हिंदु जनजागृती समितीने पुढाकार घेत ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियाना’चे आयोजन केले.

‘सुवर्णनगरी’ जळगाव येथे श्रीराम रथोत्सवास प्रारंभ

येथील १४७ वर्षांची परंपरा असलेल्या श्रीराम रथोत्सवास ८ नोव्हेंबर या दिवशी रथाचे भावपूर्ण वातावरणात पूजन करून प्रारंभ झाला. श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने कार्तिकी प्रबोधिनी एकादशीला हा उत्सव साजरा केला जातो.

अभिनेते प्रकाश राज यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या ५ अधिवक्त्यांनी केली तक्रार !

हिंदुद्वेष्टे अभिनेते प्रकाश राज यांनी रामलीलेविषयी हीन स्तरावर केलेल्या वक्तव्याचे प्रकरण कर्नाटकचे अभिनेते प्रकाश राज यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या ५ अधिवक्त्यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. काही दिवसांपूर्वी राज यांनी रामलीलेची तुलना ‘चाइल्ड पॉर्न’शी (मुलांशी संदर्भातील अश्‍लील व्हिडिओशी) केली होती.