जैसलमेर (राजस्थान) येथे चार्‍याच्या कमतरतेमुळे गायी मृत झाल्याने गायीची अंत्ययात्रा काढून साधूंकडून निषेध

बारमेर आणि जैसलमेर जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर चार्‍याची कमतरता आहे. त्याकडे केंद्र आणि राज्य सरकार यांचे लक्ष वेधण्यासाठी येथे साधू आणि नागरिक यांनी गायीची अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवला.

पुणे येथील डॉ. दुधाल यांनी गाडी थंड रहाण्यासाठी चारचाकीला गायीच्या शेणाचा लेप लावला

गायीचे शेण मिळण्यासाठी प्रथम गोहत्या रोखून गोरक्षण केले पाहिजे, त्यासाठी सरकारने केवळ कायदा न करता त्याची कार्यवाही होत आहे कि नाही, हे पाहिले पाहिजे !

गोरक्षकांमुळे मिळाले वासरांना जीवदान !

येथील मिठानगर हद्दीतून २ जून या दिवशी ७ गीर गायीच्या वासरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारी गाडी एन्आयबीएम् रोड येथे पकडण्यात आली. गाडी पकडल्यावर चालक आणि त्याचा साथीदार पळून गेले.

मौलवी सलीम मलिक यांच्या खटल्याचा २१ मे या दिवशी निकाल

अकोला येथील आतंकवादविरोधी पथकाने मौलवी सलीम यांना पुसद येथील मेंढीया मशिदीतून अटक केली होती.

पंचगव्यापासून बनवलेल्या औषधांमुळे माझा कर्करोग बरा झाला ! – साध्वी प्रज्ञासिंह

पंचगव्यापासून बनवण्यात आलेल्या औषधांमुळे माझा कर्करोग बरा झाला. पंचगव्यामध्ये दूध, दही, गोमूत्र आणि शेण या ५ पदार्थांचा समावेश असतो.  यामुळेच माझा आजार बरा झाला, असे प्रतिपादन साध्वी प्रज्ञासिंह यांनी ‘आज तक’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.

महंमद पैगंबरांनी गोमाता वाचवण्याचा संदेश दिला होता ! – मोहम्मद फैज खान, गोप्रेमी

महंमद पैगंबरांनी गोमाता वाचवण्याचा संदेश दिला होता. गायीच्या रक्षणासाठी जात आणि धर्म यांची आवश्यकता नाही. गायीचे रक्षण आपल्या परिवाराच्या कल्याणासाठी आहे, हा संदेश जनमानसात पोचवण्याचा प्रयत्न आहे. देशात धर्म परिवर्तनाचा धंदा चालू असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी नव्या पिढीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे

मांसाहारी अमेरिकी गायींचे दूध घेण्यास भारताचा नकार

मांसाहारी अमेरिकी गायींचे दूध आणि त्यापासून बनवण्यात आलेले दुग्धजन्य पदार्थ घेण्यास भारताने नकार दिला आहे. गाय हा प्राणी भारताच्या धार्मिक आणि सांस्कृतिक भावनांशी जोडला गेला आहे. त्यामुळे अमेरिकन दुग्धजन्य पदार्थांना भारताने विरोध केला आहे.

गोसंगोपन आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाचे – डॉ. वल्लभभाई कठिरिया

गो-संगोपनाचे महत्त्व भारतीय कृषी आणि अर्थकारण यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने घरोघरी गोसेवा व्हावी, असे आवाहन ‘राष्ट्रीय कामधेनू आयोग’चे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री डॉ. वल्लभभाई कठिरिया यांनी येथे केले. गो-सेवा….

कृषीप्रधान भारताचे गाय हेच अधिष्ठान ! – विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर

भारत हा कृषीप्रधान देश असून गाय हेच देशाचे अधिष्ठान आहे. वेद, उपनिषद, अग्निपुराण, ब्रह्मांडपुराण यांमध्ये गायीचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

हडपसर (जिल्हा पुणे) येथे चार गोवंशियांची कत्तल होण्यापासून त्यांना जीवदान

येथील गायकवाड कॉलनी सय्यदनगर येथून १४ फेब्रुवारीला रात्री साडेतीनच्या सुमारास चार गोवंशियांना कत्तल होण्यासाठी घेऊन जाणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली. त्यानंतर गोरक्षक आणि महंमदवाडी पोलीस त्या ठिकाणी पोहोचले असता चारही गोवंश तेथेच सोडून दिल्याचे आढळून आले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now