तक्रार करून घेण्यास टाळाटाळ करणारे निष्क्रीय पोलीस !

‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसी’ या चित्रपटाच्या विरोधात विवेक तांबे यांनी उल्हासनगरच्या पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार केली होती; मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास असमर्थता दर्शवली. तांबे हे राणी लक्ष्मीबाई यांच्या वारसांपैकी एक आहेत.

भगवद्गीतेचा अवमान करणार्‍या ‘इंडियाज् मोस्ट वॉण्टेड’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी

इंडियाज् मोस्ट वॉण्टेड’ या चित्रपटात एक पाकिस्तानी आतंकवादी भगवद्गीतेतील एका श्‍लोकाचा संदर्भ देत असल्याचा प्रसंग आहे. हिंदू असंघटित असल्यानेच चित्रपटांच्या माध्यमातून वारंवार हिंदूंच्या धार्मिक भावना लाथाडल्या जातात. असे होऊ नये म्हणून ‘हिंदूंनो, संघटित व्हा आणि धर्मावरील प्रत्येक आघाताचा सनदशीर मार्गाने प्रतिकार करा !

अभिनेते सलमान खान यांना पुरातत्व विभागाची नोटीस

मूर्तींना हानी होईपर्यंत पुरातत्व विभाग आणि राज्यातील काँग्रेस सरकार झोपले होते का ? अन्य धर्मियांच्या धर्मस्थळी चित्रीकरण करण्यास अशा प्रकारची अनुमती देण्याआधी पुरातत्व विभाग किंवा राज्य सरकार यांनी १०० वेळा विचार केला असता; मात्र हिंदू सहिष्णु असल्याने त्यांना वारंवार गृहित धरले जाते !

केरळमध्ये धार्मिक भावना दुखावल्याचे कारण सांगत ख्रिस्ती संघटनेकडून ‘ल्युसिफर’ या मल्ल्याळी चित्रपटाला विरोध

अभिनेते मोहनलाल यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ल्युसिफर’ हा मल्ल्याळी चित्रपट २८ मार्च या दिवशी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला ‘ख्रिश्‍चन डेमोक्रेटिक मुव्हमेंट ऑफ केरला’ या ख्रिस्ती संघटनेने विरोध केला आहे.

संशयित आरोपीला बाजू मांडण्याचा नैसर्गिक अधिकार डावलून त्याला अधिवक्ताही उपलब्ध होऊ न देण्यासाठी प्रयत्नरत असलेले ‘कातडी बचाव’ वृत्तीचे पोलीस प्रशासन !

‘पद्मावत’ चित्रपटाचा कोल्हापूर येथील सेट जाळल्याच्या प्रकरणात सहभागी असल्याचा कथित आरोप ठेवत कोल्हापूर पोलिसांनी २५ जानेवारी २०१९ या दिवशी धर्मप्रेमी राजेश बंगेरा यांना अटक केली.

‘मणिकर्णिका’ चित्रपटाला विरोध करणार ! – सुहास शिंदे सरकार, संस्थापक अध्यक्ष, श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य

‘मणिकर्णिका’ चित्रपटात ऐतिहासिक ग्वाल्हेर घराण्याच्या इतिहासावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यामुळे अखिल महाराष्ट्रातून ‘मणिकर्णिका’ या चित्रपटाला प्रखर विरोध करण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सुहास शिंदे सरकार यांनी पुसेसावळी (सातारा) दिली.

‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसी’ या चित्रपटाविरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी !

२५ जानेवारीला प्रदर्शित होणार्‍या ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसी’ या चित्रपटाच्या विरोधात सरकारी नोंदींत फेरफार आणि लोकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी फौजदारी गुन्हा नोंदवण्यात यावा

‘चीट इंडिया’ चित्रपटाच्या ‘पोस्टर’मध्ये हिंदूंच्या देवतांची चित्रे अवमानकारकरित्या दाखवली !

‘पोस्टर’मध्ये हिंदूंच्या देवतांची चित्रे अवमानकारकरित्या दाखवण्यात आलेल्या ‘चीट इंडिया’ या चित्रपटाचे नाव पालटून ‘व्हाय चीट इंडिया’, असे करण्यात आले आहे.

उत्तराखंडमधील भाजप सरकारकडून धर्मद्रोही ‘केदारनाथ’ चित्रपटावर बंदी

उत्तराखंडमधील भाजप सरकारने वादग्रस्त तथा धर्मद्रोही ‘केदारनाथ’ या हिंदी चित्रपटावर बंदी घातली. या चित्रपटातून ‘लव्ह जिहाद’चा प्रचार करण्यात आला असून काही दृश्यांतून हिंदूंच्या धार्मिक भावनाही दुखावण्यात आल्या असल्याचा…..

‘हिंदुत्वनिष्ठ’ भाजप सरकार अशी बंदी देशभर का घालत नाही ?

उत्तराखंडमधील भाजप सरकारने धर्मद्रोही ‘केदारनाथ’ चित्रपटावर बंदी घातली. ‘या चित्रपटातून ‘लव्ह जिहाद’चा प्रचार करण्यात आला असून हिंदूंच्या धार्मिक भावनाही दुखावण्यात आल्या आहेत’, असा आक्षेप केदारनाथ मंदिरातील पुजार्‍यांनी घेतला होता.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now