हिंदु देवतांचा अवमान करणार्‍या अनुराग बसू यांच्या ‘लुडो’ चित्रपटास ट्विटरवरून विरोध

#HinduPhobic_AnuragBasu हा ट्रेंड राष्ट्रीय ट्रेंडमध्ये तिसर्‍या क्रमांकावर !

हिंदू किती दिवस अशा प्रकारे विरोध करत रहाणार ? सरकार अशा चित्रपट आणि वेब सिरीजवर कारवाई कधी करणार ?

मुंबई – ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॉटफॉर्मवर अनुराग बसू यांचा चित्रपट ‘लुडो’ प्रकाशित झाला आहे. ज्या प्रमाणे काही वर्षांपूर्वी ‘पीके’ या चित्रपटातून हिंदु देवतांचा अवमान करण्यात आला होता, तसाच या चित्रपटातूनही अवमान करण्यात आला आहे. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. यापूर्वी बसू यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘काबुलीवाला’ या कादंबरीतही पालट करत बनवलेल्या एका वेब सिरीजमधून हिंदु मुलीला नमाजपठण करतांना दाखवले होते. या पार्श्‍वभूमीवर ट्विटरवर धर्मप्रेमी हिंदूंनी #HinduPhobic_AnuragBasu नावाने हॅशटॅग ट्रेंड करत विरोध केला. हा ट्रेंड राष्ट्रीय ट्रेंडमध्ये तिसर्‍या स्थानावर होता आणि यावर २५ सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आल्या. या माध्यमातून धर्मप्रेमींनी केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालय, तसेच केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना अनुराग बसू अन् चित्रपटाचे अभिनेते अभिषेक बच्चन यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. बसू यांच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहनही या वेळी करण्यात आले.

(वरील छायाचित्रे आणि व्हिडीओ प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. –  संपादक)

हिंदुद्वेषी ‘लुडो’ चित्रपटातील काही प्रसंग

१. ब्रह्मा, विष्णु आणि शंकर यांच्या रूपात तीन जण विचित्र वेशभूषेत रस्त्यावर नाचतांना अन् उड्या मारतांना चित्रित करणे
२. भगवान शंकर आणि देवी महाकाली यांच्या रूपातील दोघे जण गाडीला धक्का देत असणे
३. अभिनेते आणि अभिनेत्री हे अंथरुणात असतांना अभिनेत्रीच्या आईचा भ्रमणभाष आल्यावर तिने ती मंदिरात असल्याचे सांगणे
४. चित्रपटात रामलीला आणि गाय यांना उद्देशूनही अश्‍लाघ्य विनोद
५. कौरवांना नायक, तर पांडवांना खलनायक यांच्या रूपात दाखवण्याचा प्रयत्न