MP Schools Janmashtami Celebration : सर्व शाळा आणि महाविद्यालये येथे श्रीकृष्‍ण जन्‍माष्‍टमी साजरी करण्‍याचा आदेश

भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! प्रत्‍येक राज्‍यांनी असा निर्णय घेण्‍यापेक्षा केंद्र सरकारने हिंदूंचे सण साजरे करण्‍याचा आदेश संपूर्ण देशासाठी दिला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

भाजप महिला पदाधिकार्‍यांकडून वृत्तपत्र विक्रेत्यांना राखी बांधण्याचा कार्यक्रम !

महाराष्ट्रात प्रथमच भल्या पहाटे ‘वृत्तपत्र वितरण केंद्रा’वर येऊन वृत्तपत्र विक्रेता बांधवांना राखी बांधण्याचा स्तुत्य उपक्रम सौ. शिंदे यांनी स्वत:च्या पदाधिकार्‍यांसह साजरा केला.

डावे आणि जिहादी यांचा यापुढील घाला हा संस्‍कृतीवर ! – अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक

डावे आणि जिहादी यांना सध्‍याची मानवी व्‍यवस्‍था नष्‍ट करून नवनिर्मिती करायची आहे. आजपर्यंत ते कोणतीही नवनिर्मिती करू शकले नाहीत. त्‍यांनी निर्माण केलेल्‍या व्‍यवस्‍थेने केवळ अराजक आणि विध्‍वंसच केला आहे. साम्‍यवाद्यांचा यापुढील संघर्ष हा सांस्‍कृतिक आधारावर आहे.

Muslims in India : मुसलमान विद्यार्थ्यांनी ‘भारतमाता की जय’ म्हणणे टाळले !

मुसलमान मुलांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करण्याऐवजी त्यांच्या नसांनसामध्ये भारतद्वेष भिनवणार्‍यांचा सरकारने शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

DYFI PORK CHALLENGE : केरळमध्ये साम्यवाद्यांकडून डुकराचे मांस खाण्याचे आव्हान : मुसलमान संतप्त !

भूस्खलनानंतर सरकारला साहाय्य करण्यासाठी केरळमधील सत्ताधारी ‘सीपीआय (एम्)’ची युवा शाखा असलेल्या ‘डी.वाय.एफ.आय.’ने लोकांकडून देणग्या गोळा करण्यासाठी आयोजिलेला ‘पोर्क चॅलेंज’ हा एक कार्यक्रम आहे.

पुणे येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थाटात शुभारंभ !

पुणे येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रिडा संकुलामध्ये थाटात शुभारंभ झाला. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

स्वातंत्र्यानंतर आपल्याला स्वराज्य मिळाले; मात्र आपण आजही सुराज्याच्या प्रतीक्षेत ! – डॉ. मानसिंग शिंदे, सनातन संस्था

स्वातंत्र्यानंतर आपल्याला स्वराज्य मिळाले; मात्र आपण आजही सुराज्याच्या प्रतीक्षेत आहोत. त्यामुळे भ्रष्टाचार, बेकारी, नक्षलवाद, आतंकवाद यांसह ज्या विविध समस्या देशाला भेडसावत आहेत त्यासाठी घटनात्मक मार्गाने हिंदु राष्ट्राची स्थापना हेच त्यावरील उत्तर आहे…

Munawar Faruqui Apologises : हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्‍वर फारुकी याची क्षमायाचना !

मुनव्‍वर फारुकीने त्‍याच्‍या एका कार्यक्रमात, ‘कोकणी लोक इतरांना मूर्ख बनवतात’, अशा आशयाचे वक्‍तव्‍य केले होते; पण त्‍यानंतर झालेल्या मोठ्या विरोधानंतर त्‍याला क्षमा मागावी लागली.

मिरज येथील श्रीकाशीविश्वेश्वर मंदिरात श्रीमद्भगवद्गीता आणि श्रीविष्णुसहस्रनाम पठण !

श्री माधवराव गाडगीळ मित्र परिवार आणि श्री काशीविश्वेश्वर देव ट्रस्ट यांच्या वतीने येथील श्री काशीविश्वेश्वर मंदिरात तिसरा सोमवार, १९ ऑगस्ट या दिवशी सकाळी १० ते १ या वेळेत ‘फडके महिला भजनी मंडळ’ यांचे श्रीमद्भगवद्गीता संपूर्ण १८ अध्यायपठण आणि श्री विष्णु सहस्रनामाच्या पठणाचे आयोजन करण्यात आले आहे.

सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव, नवरात्रीच्या काळात ‘उल्लास- नवभारत साक्षरता’ कार्यक्रमांची जनजागृती करावी ! – पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात १० लाख ६७ सहस्र ८२३ इतके असाक्षर असून त्यापैकी ३ लाख ५३ सहस्र ६०२ पुरुष आणि ७ लाख १४ सहस्र २२१ इतक्या महिला आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्याकडे केंद्रशासनाने विशेष लक्ष दिले असून ‘उल्लास-नवभारत साक्षरता’ कार्यक्रमाची प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक आहे.