Nitesh Rane On Shri Krishna Janmabhoomi : अयोध्या मिळवली, आता श्रीकृष्णभूमीही मिळवणार ! – नितेश राणे, मत्सव्यवसाय आणि बंदरे मंत्री

श्रीकृष्णजन्मभूमी अतिक्रमणमुक्त करण्याची आरंभ गर्जना  

श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात श्री. माधव भांडारी यांच्या उपस्थित विविध मान्यवर

मुंबई – जे आमचे आहे, ते आम्हाला मिळाले पाहिजे आणि त्यावर आमचा अधिकार आहे. येथील इंच न् इंच भूमी आमची आहे. अयोध्या मिळवली आणि आता श्रीकृष्णभूमीही मिळवणार, असा विश्‍वास मत्सव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. ‘श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासा’च्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष श्री. दिनेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित कार्यक्रमात हा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी गोरक्षणासाठी कार्यरत गोरक्षकांची पाद्यपूजा करण्यात आली. यात कोल्हापूर येथील गोरक्षक श्री. नितेश ओझा सहभागी झाले होते.

कार्यक्रमात गोरक्षणासाठी कार्यरत गोरक्षकांची पाद्यपूजा करतांना कार्यकर्ते

या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष श्री. शंकर वराडकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. गोरक्षक कायद्याचेच काम करत आहेत. त्यामुळे गोरक्षकांना संरक्षण मिळावे आणि सरकारनेही त्यांना पाठिंबा द्यावा, यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत, असे प्रतिपादन भाजपचे प्रवक्ते आणि प्रदेश उपाध्यक्ष श्री. माधव भांडारी यांनी केले. या वेळी श्री. पराग फडणीस यांच्यासह महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून गोरक्षक आणि न्यासाचे पदाधिकारी उपस्थित होते.