(उरूस म्हणजे मुसलमानांचा उत्सव)
कोल्हापूर – विशाळगडावर गेल्या ६ मासांपासून कुणालाच गडावर जाण्यास अनुमती देण्यात आलेली नाही, तसेच येथे संचारबंदी आहे. तरी या पुढील काळात जर प्रशासनाने विशाळगडावर उरूस भरवण्यास अनुमती दिली, तर हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने महाआरती करण्यात येईल, अशी चेतावणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने देण्यात आली.
Pro-Hindu organisations warn of Maha Aarti if permission for Urus is granted at Vishalgad
विशाळगड l कोल्हापूर l महाराष्ट्र
Maharashtra News l Save Forts pic.twitter.com/VoUOpoAyV2— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 6, 2025
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने श्री लक्ष्मीनारायण मंदिर येथे घेण्यात आलेल्या बैठकीत ही चेतावणी देण्यात आली. बांगलादेशी हिंदूंविषयी सरकारने ठोस भूमिका घ्यावी यांसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करणे, विशाळगड अतिक्रमणमुक्तीसाठी लोकप्रतिनिधींना भेटणे असे निर्णयही या बैठकीत घेण्यात आले. या बैठकीत सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी उपस्थितांना संबोधित केले.
या प्रसंगी हिंदु एकता आंदोलन, विश्व हिंदु परिषद, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, भारत रक्षा मंच, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, हिंदु महासभा, श्रीराम सेना, अखिल भारत हिंदु महासभा, शिवसेना, भाजप, बजरंग दल, ‘श्री’ संप्रदाय यांसह अन्य संघटनांचे प्रतिनिधी या प्रसंगी उपस्थित होते.