पुणे, २८ डिसेंबर (वार्ता.) – पिंपरखेड, तालुका शिरूर, पुणे गावठाण येथे ‘आशीर्वाद सुवार्ता प्रतिष्ठान’ या नावाने ख्रिस्त्यांच्या प्रार्थनास्थळामध्ये २५ डिसेंबर या दिवशी धर्मांतरासाठी प्रार्थना आयोजित केली होती. (यातून ख्रिस्ती धूर्तपणे हिंदु नावे असलेल्या संस्था उघडून हिंदूंचे धर्मांतर करतात, हे लक्षात येते ! – संपादक) सदर प्रार्थनेमध्ये १५० हून अधिक हिंदू सहभागी झाले होते. सदर कार्यक्रम थांबवण्याचा प्रयत्न केला असता तेथील लोकांचा प्रचंड विरोध झाला. सदर विरोध डावलून प्रार्थना थांबवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्मजागरण शाखेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे परियोजना प्रमुख श्री. माधवराव खोत, तसेच पुणे विभागाचे संयोजक श्री. संतोष गायकवाड, तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, आंबेगावचे अध्यक्ष श्री. कमलेश तुळे, तालुका संयोजक श्री. सचिन तागड आदींनी सदर हिंदूंचे प्रबोधन केले आणि धर्मांतर रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलीस फौजफाटा घेऊन घटनास्थळी पोचले आणि प्रार्थनेचा कार्यक्रम थांबवला.
जांबूत तालुका, शिरूर, पुणे येथेही अशाच पद्धतीने अनधिकृत चर्चमध्ये प्रार्थनेचा कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रम थांबवण्याचा पोलिसांनी निर्णय घेतला, तरीही शंभराहून अधिक लोक घटनास्थळी थांबून राहिले होते. तिथेही अत्यंत तणावात धर्मजागृती म्हणून हिंदुत्वनिष्ठांनी स्वत:ची भूमिका उपस्थितांपुढे मांडून पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने प्रार्थना बंद केली, अशी माहिती संघाचे श्री. ढगे यांनी दिली.
संपादकीय भूमिकाधर्मांतरबंदी कायद्याची आवश्यकता स्पष्ट करणारी घटना ! |