मानसन्मान बाजूला ठेवून धर्म आणि मंदिरे यांसाठी ‘मंदिर रक्षक’ म्हणून एकत्र या ! – लखमराजे भोसले, युवराज, सावंतवाडी संस्थान

मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशिला आहेत, चैतन्याचे स्त्रोत आहेत. ते टिकवून ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. मंदिरांचे पावित्र्य राखणे, संघटन करणे, सुव्यवस्थापन करणे हे सर्व कार्य ईश्‍वराचे अधिष्ठान ठेवून करणे आवश्यक आहे.

Work From Home : कर्मचार्‍यांनी घरातून काम केल्यास वैयक्तिक आणि संस्थात्मक वाढीस चालना मिळत नाही ! – क्रितीवासन्, टाटा कन्सलटन्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी

कोरोना महामारीच्या काळात अनेक आस्थापनांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना घरातून काम करण्याची (‘वर्क फ्रॉम होम’ची) सुविधा दिली होती. ही सुविधा अजूनही अनेक आस्थापनांमध्ये चालू आहे. कामाची ही पद्धत कर्मचारी आणि आस्थापने यांच्या मुळावर उठल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे.

उद्या पेढांबे (ता. चिपळूण) येथे ग्रामदेवता श्री सुकाईदेवी मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा

माघ शुक्ल द्वादशी (२१ फेब्रुवारी) ते माघ शुक्ल त्रयोदशी (२२ फेब्रुवारी २०२४) या कालावधीत श्री सुकाईदेवी मंदिराचा जीर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा धार्मिक विधीपूर्वक साजरा होत आहे. या निमित्ताने . . .

गोवा : दंगल घडवल्याच्या प्रकरणी २० जणांच्या विरोधात गुन्हा नोंद

राज्याच्या मंत्र्यांवर आक्रमण झाले असतांना दुसर्‍या दिवशी गुन्हा नोंद करणारे पोलीस सामान्यांच्या संदर्भात कशी कारवाई करत असतील ?

भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या सैन्य अभ्यासात ५१ देशांचे नौदल सहभागी !

भारतीय नौदलाने १९ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम् येथे ‘मिलन-२४’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत सर्वांत मोठा सैन्य अभ्यास चालू केला आहे. यामध्ये ५१ देशांचे नौदल सहभागी झाले आहे.

Goa Shivjayanti Christian Attack : गोव्यात शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी गेलेले मंत्री फळदेसाई यांच्यावर ख्रिस्त्यांचे आक्रमण !

मंत्र्यांवर आक्रमण करण्याइतपत उद्दाम झालेले गोवा राज्यातील ख्रिस्ती ! या आक्रमणामागील खरा सूत्रधार कोण आहे, हे शोधून सरकारने सत्य समोर आणणे आवश्यक !

पुणे येथे ९५ ‘स्वराज्य रथां’ची मानवंदना आणि मिरवणूक !

‘शिवजयंती महोत्सव समिती, पुणे’ यांच्याकडून आयोजित केलेल्या ‘शिवजयंती’च्या तपपूर्ती सोहळ्यामध्ये ९५ स्वराज्य रथांची मानवंदना दिली जाणार आहे, अशी माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात संतांची वंदनीय उपस्थिती !

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाला सनातनच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर, पू. (सौ.) संगीता जाधव आणि वसई येथील परशुराम तपोवन आश्रमाचे पूज्य भार्गवश्री बी.पी. सचिनवाला उपस्थित होते.

गोवा : ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी नियमांचे उल्लंघन करून चर्च संस्थेकडून ‘फेस्ता’चे आयोजन !

शासन यावर कोणती कारवाई करणार आहे ? किमान पुढील वर्षीपासून तरी ख्रिस्त्यांचे हे अतिक्रमण बंद होणार का ?

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान !

वेदपरंपरेचे रक्षणकर्ते, विश्वभर गीतेचा प्रसार करणारे आणि श्रीराममंदिराचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.