चीनने पुन्हा आगळिक केल्यास त्याला उत्तर देण्याचा सैन्याला पूर्ण अधिकार

चीनने नियंत्रणरेषेवर पुन्हा आक्रमकपणा दाखवण्याचा प्रयत्न केल्यास त्याला उत्तर देण्याचा भारतीय सैन्याला पूर्ण अधिकार देण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. संरक्षण मंत्रालयाची तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांशी २१ जून या दिवशी बैठक पार पडली.

नेपाळशी भारताचे रोटी-बेटीचे नाते असल्याने चर्चेतून वाद सोडवले जातील ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

चीनचा बटीक बनलेला नेपाळ आता भारतद्वेषाने पछाडला आहे. त्यामुळे त्याच्याशी ‘रोटी-बेटी’चे व्यवहार हा इतिहास झाला आहे. आता नेपाळला हाताळण्यासाठी परराष्ट्रनीतीमध्ये पालट करावा लागेल. भारत सरकारने हे लक्षात घ्यावे, हीच भारतियांची अपेक्षा आहे !

भारत आता कमकुवत देश राहिलेला नाही ! – संरक्षणमंत्री

भारत स्वतःच्या राष्ट्रीय गौरवाशी जराही तडजोड करणार नाही. भारत आता कमकुवत देश राहिलेला नाही, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. जम्मू-काश्मीरमध्ये ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे आयोजित जनसंवाद सभेत ते बोलत होते.