शाळेत परंपरा पाळण्यास बंदी नसल्याचे शाळेचे स्पष्टीकरण

बोर्डे, डिचोली येथील सरकारी प्राथमिक शाळेत हिंदु रितीरिवाज पाळण्यास विद्यार्थिनींवर कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाहीत. शाळेत विद्यार्थिनींना हिंदु रितीरिवाज पाळण्यास एका पालकाने आक्षेप घेतल्याचे वृत्त खोटे आणि शाळेला अपकीर्त करणारे आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘आधीच्या युगांत प्रजा सात्त्विक असल्याने ऋषींना समष्टी प्रसारकार्य करावे लागायचे नाही. आता कलियुगात बहुतेकजण साधना करत नसल्याने संतांना समष्टी प्रसारकार्य करावे लागते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पाश्‍चात्त्यांना असलेली वैदिक संस्कृतीची गरज

‘विज्ञानाच्या कुबड्यांवरच पश्‍चिमी संस्कृती आज लंगडते आहे ! याचा अर्थ स्पष्ट आहे, ‘विज्ञानाच्या कुबड्या निसटल्या की, पश्‍चिमी संस्कृती ही कोलमडलीच !’ आज पश्‍चिमेलाच वैदिक संस्कृतीची ओढ आहे, नव्हे गरज आहे.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामी

हिंदूंमुळेच जगभरात सर्वाधिक सुखी मुसलमान भारतात ! – सरसंघचालक मोहन भागवत

जगात केवळ भारतातच मुसलमान सुखी आणि सुरक्षित आहेत, तसेच त्यांना भारतातच सर्वाधिक सवलती अन् सुविधा मिळतात, हे वास्तव आहे.

संरक्षणमंत्र्यांनी केलेल्या राफेल पूजनाचा अभिमानच असायला हवा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

भारतीय परंपरेत दसर्‍याच्या दिवशी सर्वजण शस्त्रपूजन करतात. आपल्या घरातही आपण शस्त्रपूजन करतो.

शनिशिंगणापूर येथील प्रसाद वाटपाची परंपरा बंद करणे चुकीचे ! – ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते, अध्यक्ष, राष्ट्रीय वारकरी परिषद

देवाच्या दर्शनानंतर प्रसाद दिला जातो. त्यातून चैतन्य आणि शक्ती मिळते, तसेच त्या देवतेविषयीची भक्ती वाढते. तेव्हा प्रसाद देणे चालूच ठेवले पाहिजे. प्रसाद बंद करून झाडे लावायला देणे म्हणजे हिंदूंच्या प्रथा आणि परंपरा बंद करणे होय. या पातकापासून दूर रहावे. राष्ट्रीय वारकरी परिषद याचा जाहीर निषेध करत आहे.

जिहादी त्यांच्या धर्मग्रंथाचा आधार घेतात आणि त्यानुसार वागतात; पण हिंदु कार्यकर्ते आपल्या धर्मग्रंथांच्या आधारानुसार का वागत नाहीत ?

‘जिहादी आतंकवादी हिंसात्मक कृत्ये करण्यासाठी त्यांच्या धर्मग्रंथाचा आधार घेतात आणि त्यानुसार वागतात; परंतु धर्मरक्षणासाठी सतत कार्यरत असणारे हिंदु कार्यकर्ते आपल्या धर्मग्रंथांच्या आधारानुसार का वागत नाहीत ?….

मला जे योग्य वाटले, ते केले आणि भविष्यातही करणार !

‘राफेल’च्या पूजेविषयी टीका करणार्‍यांना राजनाथ सिंह यांचे प्रत्युत्तर – या सृष्टीत कुठली ना कुठली एक सर्वोच्च शक्ती (सुपरपॉवर) आहे. मी तसे लहानपणापासून मानत आलो आहे. त्या विश्‍वासातून मला जे योग्य वाटले, ते मी केले. त्याविषयी कोणाला काहीही वाटो. – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

रायगड जिल्ह्यात नवरात्रोत्सवानिमित्त धर्मशिक्षणाचा जागर

शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने ठिकठिकाणी प्रवचनांच्या माध्यमातून ‘नवरात्रीचे शास्त्र आणि साधनेचे जीवनातील महत्त्व’ आदी विषयांची माहिती देण्यात आली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘हिंदु धर्मात धर्मप्रसारासह धर्माच्या खोलात, सूक्ष्मात जाण्याला अधिक महत्त्व आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले


Multi Language |Offline reading | PDF