जॉनरोज यांची वादग्रस्त भूमिका !

सर्व वैद्यकशाखांनी एकत्र येऊन भारतियांचे आरोग्य चांगले होण्यासाठी तोडगा काढला पाहिजे. अशा वेळी ही द्वेषाची भाषा देशविरोधी आहे. त्यामुळेच जॉनरोज यांनीच प्रथम देशाची क्षमा मागितली पाहिजे !

(म्हणे) ‘रामदेवबाबा यांनी क्षमायाचना न केल्यास त्यांच्याविरुद्ध १ सहस्र कोटी रुपयांचा दावा प्रविष्ट करणार !’ – आय.एम्.ए.च्या उत्तराखंड शाखेची चेतावणी

आय.एम्.ए.चे अध्यक्ष डॉ. जयलाल यांनी एका मुलाखतीत कोरोना संसर्गाचा प्रकोप न्यून होण्याचे श्रेय डॉक्टरांना देण्याऐवजी येशू ख्रिस्ताला दिले होते. या ख्रिस्तीधार्जिण्या वक्तव्याविषयी आय.एम्.ए. त्यांच्यावर दावा प्रविष्ट करण्याचे धारिष्ट्य दाखवणार का ?

हरियाणा सरकार राज्यामध्ये कोरोना रुग्णांना देणार पतंजलीचे ‘कोरोनिल किट’ !

हरियाणामध्ये कोरोना रुग्णांमध्ये पतंजलि आस्थापनाच्या एक लाख ‘कोरोनिल किट’चे वाटप करण्यात येणार आहे. हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

(म्हणे) ‘अ‍ॅलोपॅथीवर टीका करणार्‍या रामदेवबाबांवर गुन्हा नोंदवा !’  

कोरोना महासाथीच्या पार्श्‍वभूमीवर भारतात ठिकठिकाणी बर्‍याच डॉक्टरांकडून रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाझार करणे किंवा डॉक्टरांच्या चुकीमुळे रुग्ण दगावणे यांसारखी अनेक प्रकरणे बाहरे आली. अशा कर्तव्यशून्य आणि भ्रष्ट डॉक्टरांवर कारवाई करण्याविषयी आय.एम्.ए. मूग गिळून गप्प बसते.

योगतज्ञ रामदेवबाबा आणि अनिल अंबानी यांना दिलेल्या भूमींवर उद्योग कधी उभे रहाणार ? – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

योगतज्ञ रामदेव बाबांच्या पतंजली समूहाच्या ‘हर्बल अ‍ॅण्ड फूड पार्क’ला, तसेच उद्योगपती अनिल अंबानी यांना शासनाने नागपूर येथे दिलेल्या भूमीवर उद्योग कधी उभे रहाणार ?, असा प्रश्‍न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत १० मार्च या दिवशी प्रश्‍नोत्तरात उपस्थित केला.

मध्यप्रदेशातील सर्व सरकारी कार्यालयांच्या स्वच्छतेसाठी गोमूत्रापासून बनवलेल्या गो-फिनाईलचा वापर करण्यात येणार !

काँग्रेसने देशात सत्तेत असतांना सर्वच क्षेत्रात इतकी अस्वच्छता निर्माण करून ठेवली आहे ती स्वच्छ करायला गो-फिनाईलच उपयोगी पडणार आहे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटेल !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीचा २१ वा वर्धापनदिन सोहळा

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीचा २१ व्या वर्धापनदिन सोहळ्यातील मान्यवरांचे ओजस्वी विचार !

पतंजलि, डाबर, झंडू, बैद्यनाथ आदी १३ मोठी आस्थापने मधाच्या नावाखाली साखरेचा पाक विकतात ! – सी.एस्.ई.चा दावा

पतंजलि आणि डाबर यांनी या चाचणीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. पतंजलि चे म्हणणे आहे की, नैसर्गिकरित्या मध बनवणार्‍या आस्थापनांच्या अपकीर्तीचा हा प्रयत्न आहे !, तर डाबर चे म्हणणे आहे की, जो अहवाल समोर आला आहे, तो प्रायोजित आहे !