मध्यप्रदेशातील सर्व सरकारी कार्यालयांच्या स्वच्छतेसाठी गोमूत्रापासून बनवलेल्या गो-फिनाईलचा वापर करण्यात येणार !

(म्हणे) ‘पतंजलीला लाभ मिळवण्यासाठी भाजप सरकारचा निर्णय !’ – काँग्रेसची टीका

काँग्रेसने देशात सत्तेत असतांना सर्वच क्षेत्रात इतकी अस्वच्छता निर्माण करून ठेवली आहे ती स्वच्छ करायला गो-फिनाईलच उपयोगी पडणार आहे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटेल !

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील सरकारी कार्यालयांमध्ये फरशी स्वच्छ करण्यासाठ ‘गो-फिनाईल’चा वापर करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने याविषयी सर्व विभागप्रमुखांना आदेश दिला आहे. पंचायतपासून मंत्रालयापर्यंतच्या कार्यालयांमध्ये या गो-फिनाईलचा वापर करण्यात येणार आहे.

काँग्रेसने सत्ताधारी भाजप सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. काँग्रेसचे आमदार कुणाल चौधरी म्हणाले की, सरकार गो-फिनाईलच्या माध्यमांतून ‘पतंजलि’ आस्थापनाला लाभ पोचवण्याचा प्रयत्न करत आहे. जर सरकारला गो-फिनाईलचा वापर करायचा असेल, तर राज्यातील गोशाळांतून बनवण्यात येणार्‍या गो-फिनाईलचा वापर करण्यासाठी कंत्राट देण्यात यावे.

गो- फिनायल काय आहे ?

गोमूत्रापासून बनवण्यात आलेले गो -फिनायल किटाणूनाशक आहे. यात पाइन ऑयल, पाणी, सिट्रोनेला आणि कृत्रिम सुगंधित पदार्थ यंत्राद्वारे चांगल्या प्रकारे मिसळले जाते. १०० लीटर गो-फिनाईल बनवण्यासाठी सुमारे ७० लिटर गोमूत्राचा वापर केला जातो. एक लिटर गो-फियाईल बनवण्यासाठी २५ रुपये खर्च येतो आणि बाजारात ते ३० रुपयांची विकले जाते. योगऋषी रामदेवबाबा यांचे पतंजलि आस्थापन आणि अन्य काही लहान आस्थापने गो-फिनाईलची विक्री करतात.