काँग्रेस भरकटली आहे ! – काँग्रेस नेते भूपिंदरसिंह हुडा यांचा घरचा अहेर

माझा पक्ष पूर्णपणे भरकटला आहे. हा पूर्वीचा काँग्रेस पक्ष राहिलेला नाही. कलम ३७० हटवण्यास माझा पाठिंबा होता; मात्र पक्षातील काही नेत्यांचा त्याला विरोध होता.

आता केवळ पाकव्याप्त काश्मीरवरच पाकशी चर्चा होईल ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

पाकव्याप्त काश्मीरवरही पाकशी चर्चा कशाला ? पाकव्याप्त काश्मीरही भारताचाच भाग आहे, हे जगजाहीर आहे आणि तो भाग परत घेण्याचा भारताला पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे आता थेट सैनिकी कारवाई करून हा भाग कह्यात घेणे, हेच भारताने केले पाहिजे !

हिसार (हरियाणा) येथील सैन्यतळावर हेरगिरी करणार्‍या ३ धर्मांधांना अटक

सैन्याची गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईतून येथील सैन्यतळ असणार्‍या केंट परिसरातून पाकसाठी हेरगिरी करणार्‍या ३ धर्मांधांना अटक करण्यात आली आहे. अशा देशद्रोह्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने कायदा केला पाहिजे !

हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून पळवून नेणार्‍या धर्मांधाला अटक

येथील हथवाला गावातून हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिला पळवून नेणार्‍या धर्मांध तरुणाला पोलिसांनी देहली येथे अटक केली आणि या तरुणीची सुटका केली. या तरुणीशी तो बलपूर्वक विवाह करणार होता.

पलवल (हरियाणा) येथे गोतस्करांच्या गोळीबारात एक गोरक्षक ठार

एरव्ही गोतस्करी रोखतांना गोरक्षकांकडून होणार्‍या कथित मारहाणीवरून देशात असहिष्णुता वाढल्याची ओरड करणारे या घटनेविषयी का बोलत नाहीत ? आणि प्रसारमाध्यमे अशा घटनांना प्रसिद्ध का देत नाहीत ?

हरियाणामधील काँग्रेसचे नेते आणि त्यांच्या कुटुंबियांच्या घरांवर आयकर विभागाच्या धाडी

आयकर विभागाने हरियाणातील काँग्रेसचे नेते कुलदीप बिश्‍नोई आणि त्यांच्या कुटुंबियांच्या घरांवर धाडी घातल्या. हरियाणातील हिसार, मंडी आदमपूर, गुरुग्राम आदी १३ ठिकाणी या धाडी घालण्यात आल्या.

धर्मांधांच्या मारहाणीत गंभीररित्या घायाळ झालेल्या हिंदु अधिवक्त्याचा उपचाराच्या वेळी मृत्यू

जमावाकडून झालेल्या मारहाणीत मुसलमानांचा मृत्यू झाल्यावरून आकाशपाताळ एक करणारे अशा घटनांविषयी मात्र मौन बाळगतात ! ‘आता हिंदूंनीही स्वरक्षणासाठी परवानाधारक शस्त्र बाळगावे’, असे शिया धर्मगुरु मौलाना कल्बे जवाद हे सांगतील का ?

फरिदाबाद येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात कु. नीलू (अनिता) राणा (वय २७ वर्षे) यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित

तळमळीने सेवा करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अनन्य भाव असणार्‍या फरिदाबाद येथील साधिका कु. नीलू (अनिता) राणा (वय २७ वर्षे) या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या.

हिंदु व्यावसायिकाकडे १ कोटी रुपयांची खंडणी मागणार्‍या धर्मांध महिला परिचारिकेला अटक

येथील परिचारिका फिजा खान हिने सुनील पाहवा या हरिद्वार येथील व्यावसायिकाला त्याच्या मुलाचे अपहरण करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे १ कोटी रुपयांची खंडणी मागितली.

५ सहस्र रुपयांसाठी ‘फेसबूक’वरील विदेशी मैत्रिणीला गोपनीय माहिती पुरवणार्‍या सैनिकाला अटक

५ सहस्र रुपयांच्या मोबदल्यात ‘फेसबूक’वरील एका विदेशी मैत्रिणीला देशाच्या संरक्षणाविषयीची गोपनीय माहिती पुरवणार्‍या रवींद्र या ‘५ कुमाऊ रेजिमेंट’च्या सैनिकाला अटक करण्यात आली. काही रुपयांसाठी देशद्रोह करणार्‍यांना कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !


Multi Language |Offline reading | PDF