सलग दुसर्‍या दिवशीही कर्जमाफी आणि महिलांवरील अत्याचार या सूत्रांवरून विरोधकांचा विधान परिषदेत गोंधळ

विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे २५ फेब्रुवारीला कर्जमाफी आणि महिलांवरील अत्याचार या सूत्रांवरून विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे सभापतीनी प्रथम ३० मिनिटे, त्यानंतर २५ मिनिटे सभागृह तहकूब केले. त्यानंतरही गोंधळ चालूच ठेवल्याने सभापतींनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.

शेतकर्‍यांना कर्जमाफी आणि महिलांना सुरक्षा देण्याच्या प्रश्‍नांवरून विरोधकांचा विधानसभेत गदारोळ !

अर्थसंकल्पाच्या दुसर्‍या दिवशी कामकाजाला प्रारंभ होताच ‘शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करून त्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी आणि राज्यातील महिलांवर अत्याचार होत असल्याने त्यांना सुरक्षा प्रदान करावी’ या प्रमुख मागण्यांसाठी २५ फेब्रुवारी या दिवशी विधानसभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ घातला.

कर्जमुक्तीची पहिली सूची उद्या घोषित होईल ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषद : जाहीरनाम्यातील अनेक वचनांची आम्ही पूर्ती केली आहे. शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीची पहिली सूची उद्या घोषित होईल. या योजनेचा पहिला टप्पा आता चालू होऊन ३ मासांत पूर्ण होईल. एकेका टप्प्याने योजना पुढे नेऊन त्या पूर्ण करत आहोत.

कोरेगाव भीमा प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने अन्वेषण एन्.आय.ए.कडे दिले ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

सत्तेतील ३ पक्षांत सुसंवाद नसल्याने विरोधी पक्षनेत्यांचा चहापानावर बहिष्कार ! कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषद ही प्रकरणे वेगळी नसून एकच आहेत. या प्रकरणांची व्याप्ती राज्याच्या बाहेर अन्य राज्यांतही आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या प्रकरणांचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (एन्.आय.ए.कडे) सोपवले आहे.