आत्मनिर्भरता कागदावरच ?

योगऋषी रामदेवबाबा यांच्या पतंजलि आस्थापनाकडून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी बनवलेल्या आयुर्वेदीय औषधाचा वापर करण्याचा प्रस्ताव इंदूर (मध्यप्रदेश) येथील जिल्हाधिकार्‍यांनी फेटाळला. आयुर्वेदाविषयी आदर असणारे, तसेच ‘स्वदेशी’विषयी आग्रही असणारे यांचा या वृत्तामुळे हिरमोड होणे साहजिक आहे.

इंदूर (मध्यप्रदेश) येथे पतंजलि आस्थापनाच्या कोरोनावरील औषधाचा वापर करण्यास प्रशासनाकडून नकार

कोरोनावर कुणी आयुर्वेदीय औषधांची निर्मिती करत असेल, तर केंद्र सरकारने त्याचे परीक्षण करावे आणि ते योग्य असल्यास त्याचा वापर करण्याची अनुमती द्यावी. त्यासाठी तशी यंत्रणा राबवावी, असेच जनतेला वाटते !

देशातील हिंसा थांबवण्यासाठी चांगले संस्कार करा ! – योगऋषी रामदेवबाबा

आज काही जण देशात अनेक प्रश्‍न उपस्थित करत आहेत. देशात हिंसा वाढली आहे; पण ती थांबण्यासाठी चांगले संस्कार हा उपाय आहे, असे प्रतिपादन योगगुरु रामदेवबाबा यांनी ८ डिसेंबरला संगमनेर येथील गीता महोत्सवामध्ये बोलतांना केले.