भारताला समजून घ्यायचे असेल, तर संस्कृत जाणून घेणे अनिवार्य ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
‘संस्कृत’ला भारताची राष्ट्रभाषा घोषित करून ती शाळेत पहिलीपासून शिकवण्याचा कायदा करणे आवश्यक झाले आहे !
‘संस्कृत’ला भारताची राष्ट्रभाषा घोषित करून ती शाळेत पहिलीपासून शिकवण्याचा कायदा करणे आवश्यक झाले आहे !
भारतातील ज्ञानपरंपरा आणि प्रथांची विद्यार्थ्यांसाठी परिभाषा-कोश (संस्कृत-मराठी) भारतीय ज्ञान परंपरेचा शिक्षार्थी कोश निर्मिती या विषयावर ५ दिवसांची कार्यशाळा संस्कृत उपकेंद्रात झाली.
प्रादेशिक भाषांमध्ये तांत्रिक शब्दनिर्मितीचे कार्य नियोजित पद्धतीने राबवले जात असून या माध्यमातून भारतीय ज्ञानपरंपरेचे शास्त्रीय आणि सुसंगत दस्तऐवजीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे.
दर्शनशास्त्र, वेद किंवा उपनिषद या सर्व गोष्टींचा वैज्ञानिक ऊहापोह व्हावा. समाजापुढे उपनिषद, दर्शनाला मोक्षाचा मार्ग म्हणून पाहिले जाते, ते योग्य आहे; परंतु या या दर्शनशास्त्राचा मूळ उद्देश सृष्टीला समजून घेणे, सृष्टीचा उगम कसा झाला ? हा आहे.
पुणे, १९ मार्च (वार्ता.) – महामहोपाध्याय (म.म.) वासुदेवशास्त्री अभ्यंकर संस्कृत पाठशाळा आणि ‘संस्कृत सेवा फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भाषाभ्यास – संस्कृत प्रावीण्याचा मार्ग’ या संस्कृतच्या ई-अभ्यासक्रमातील ‘स्तर १ – भाषाङ्कुरः’ यामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण, तसेच प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्याला ताम्रपत्र प्रदान करण्याचा समारंभ १५ मार्च या दिवशी येथील वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या सभागृहात उत्साहात … Read more
संस्कृतमधील बौद्ध ग्रंथ समजून घेण्यासाठी अभ्यासक्रम शोधत असतांना ब्राझिलमधील एका प्राध्यापकांचा संपर्क ‘संस्कृत सेवा फाऊंडेशन’शी आला. त्यांनी ‘संस्कृत सेवा फाऊंडेशन’च्या ‘भाषाङ्कुरः’ (स्तर १) या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला.
डॉ. काणे यांनी वेद, उपनिषदे, स्मृतिग्रंथ यांसारख्या संस्कृत साहित्याचा अत्यंत सूक्ष्म अभ्यास केला. ज्यातून त्यांनी मांडलेली मते अत्यावश्यक धार्मिक प्रथा ही संज्ञा स्वातंत्र्योत्तर काळातील केसेसमध्ये न्यायालयांना ठरवण्यात उपयुक्त ठरली.
कोकण निसर्गाने जेवढे समृद्ध आहे, तेवढेच बुद्धीमत्तेने संपन्न, समृद्ध आहे. कोकणात अनेक संस्कृत विद्वान होऊन गेले. ज्यांनी भरीव कार्य केले. कोकणातील संस्कृत विद्वानांचे कार्य जिवंत झर्याप्रमाणे आहे.
महाराष्ट्र एकमेव असे राज्य आहे, ज्या राज्यात १० भाषांसाठी साहित्य अकादमी कार्यरत आहे. शासन स्तरावरून संस्कृत भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य संस्कृत अकादमी कार्यान्वित करण्यात आली.
आपल्याला संस्कृत भाषेविषयी अभिमान अनुभवता आला पाहिजे. वेळात वेळ काढून संस्कृत भाषेचे श्रवण केले पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येकाने दैनंदिन जीवनात संस्कृत भाषेचा वापर केल्यास संस्कृतचे महत्त्व सर्वदूर पोचेल.